पुणे : Pune Crime News | सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवर (Sun City, Anand Nagar, Pune) बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या गोळीबाराने (Firing In Pune) सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरात खळबळ उडाली होती. बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे कार्यक्रमात वर्गणी कोण जास्त देणार, यावरुन व्हाटसअॅप ग्रुपवरील (WhatsApp Group) वादावादीतून गोळीबार झाला होता. त्याला आता आणखी एक वळण लागले असून त्यात गोळीबार करणार्या व्यावसायिकाकडून खंडणी (Extortion Case) वसुल केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याबाबत संतोष सेवू पवार (वय ३५, रा. बावधन) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रमेश बद्रिनाथ राठोड आणि देवा ऊर्फ देविदास सोमनाथ राठोड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. देवा राठोड याला अटक केली आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हा पोलीस ठाण्यात (Velha Police Station) २०१५ मध्ये
रोहिदास चोरगे याच्या विरुद्ध फिर्यादी यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.
भविष्यात फिर्यादी यांना त्रास होऊ नये, याकरीता रमेश राठोड याला फिर्यादी यांनी मध्यस्थी करण्यास सांगितले होते.
त्यात राठोड याने मध्यस्थी केली, म्हणून जुलै २०१५ पासून आजपर्यंत वेळोवेळी भेटून पैशांची मागणी केली.
तेव्हा फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला होता.
त्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ५ ते ६ लाख रुपये रोखीने वसुल केले आहे.
मंगळवारी रात्री गोळीबार झाला, त्यावेळी आरोपींनी या व्यावसायिकाकडे पैशाची मागणी करुन हाताने
मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक कादबाने तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Firing on Suncity Road in Sinhagad Road area took a different turn; Extortion case filed
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Kasba-Chinchwad Bypolls | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आता 26 फेब्रुवारीला मतदान
Pune Pimpri Crime | विजेचे बील थकल्याचे सांगत साडेनऊ लाखांची फसवणूक, भोसरी परिसरातील घटना