Pune Kasba-Chinchwad Bypolls | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आता 26 फेब्रुवारीला मतदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Kasba-Chinchwad Bypolls | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत चर्चेत राहिलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांच्या (Pune Bypolls) तारखा बदलण्यात आल्या आहेत. याबाबतचे परिपत्रक निवडणुक आयोगाकडून (ECI) प्रसिध्द करण्यात आले आहे. मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या दोन जागांवर निवडणुक आयोगाकडून निवडणुक जाहीर करण्यात आली होती. मात्र आता या तारखा बदलण्यात आल्या आहेत. राज्यातील बारावी (12th) आणि पदवी परिक्षेच्या (Graduation Exam) तारखा आणि निवडणुकांच्या तारखा एकाच वेळी येत असल्याने निवडणुक आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Kasba-Chinchwad Bypolls)

निवडणुक आयोगाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि कसबा विधानसभा मतदारसंघ होणाऱ्या निवडणुकांसाठी आता ३१ जानेवारी रोजी अधिसुचना काढली जाईल. असे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी असेल. ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी या दोन्ही मतदारसंघात मतदान घेण्यात येईल. असं नुकतंच निवडणुक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

यानंतर पूर्वनियोजीत कार्यक्रमाप्रमाणेच म्हणजेच २ मार्च रोजी इतर राज्यातील पोटनिवडणुकांच्या (Pune Kasba-Chinchwad Bypolls) निकालादिवशी या दोन्ही मतदारसंघातील मतमोजणी केली जाईल. या पोटनिवडणुकांची प्रक्रिया निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार ४ मार्च पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक असेल.

दरम्यान, या पोटनिवडणुकांसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये खलबतं सुरू असून प्रत्येकाने बैठकी
घ्यायला सुरूवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
हे पिंपरी चिंचवड मधील कार्यकर्त्यांची भेट नियोजीत वेळेनुसार आज दुपारी १ वाजता घेणार आहेत.
तसेच, महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाची देखील यासंबंधी बैठक
आज मुंबईत आयोजीत करण्यात आली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पुण्यातील नगरसेवकाने उद्धव ठाकरे
(Uddhav Thackeray) यांना ठाकरे गटाने कसबा विधानसभा निवडणुक लढवावी अशी विनंती केली होती.
त्यावर आज या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. मात्र, त्यातच निवडणुक आयोगाने एक परिपत्रक
प्रसिध्द केल्याने आता चर्चा होणार का की ही चर्चा पुढे ढकलली जाणार याविषयीची अधिक माहिती प्राप्त झाली नाही.

Web Title :- Pune Kasba-Chinchwad Bypolls | chinchwad kasba peth by election dates change election commission declared