Pune Crime News | जबरी चोरी व मोबाईल चोरी करणारा अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात, 10 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर आणि परिसरात जबरी चोरी व मोबाईल चोरी (Mobile Theft) करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला (Minor) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट पाचच्या (Unit 5) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 10 गुन्हे उघडकीस आणून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई हडपसर परिसरातील ससाणेनगर येथे केली. (Pune Crime News)

पुणे शहरात मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पथक हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी मिळालेल्या माहितीवरुन एका अल्पवयीन मुलाला ससाणेनगर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 10 मोबाईल जप्त केले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने अल्पवयीन मित्राच्या मदतीने पुणे शहरातील विविध परिसरातून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 1 लाख 45 हजार 500 रुपये किमतीचे 10 मोबाईल व एक दुचाकी जप्त केली आहे. (Pune Crime News)

आरोपीकडून चाकण (Chakan Police Station), चंदननगर (Chandannagar Police Station),
वानवडी पोलीस ठाण्यातील (Wanwadi Police Station) प्रत्येकी एक, हडपसर पोलीस ठाण्यातील तीन,
विमानतळ पोलीस ठाण्यातील (Viman Nagar Police Station) दोन, लोणावळा पोलीस ठाण्यातील
(Lonavala Police Station) दोन असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार)
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे
(DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (PI Mahesh Bolkotgi), सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar),
(PSI Avinash Lohote) पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, चैताली गपाट (PSI Chaitali Gapat),
पोलीस अंमलदार आश्रूबा मोराळे, दया शेगर, रमेश साबळे, पल्लवी मोरे, राजस शेख, प्रताप गायकवाड, पृथ्वीराज पांडुळे,
प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दाऊद सय्यद, अकबर शेख, अमित कांबळे, शहाजी काळे, शशिकांत नाळे, विलास खंदारे,
पांडुरंग कांबळे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘त्या’ महिलेचा खूनच ! न्यायवैद्यक अहवालावरून स्पष्ट, सव्वा तीन वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल; पर्वती येथे आढळला होता मृतदेह

शिवीगाळ करुन महिलेसोबत गैरवर्तन, लोहगाव मधील कॅफेतील प्रकार