Pune Crime News | विजेचे बिल थकल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, पुण्यातील एरंडवणे परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तुमचे मागील महिन्याचे वीज बिल थकले असल्याचे सांगून एका ज्येष्ठ नागरिकाची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.3) सकाळी साडेनऊ ते साडेबाराच्या दरम्यान एरंडवणे येथील हिमाली सोसायटीती ज्येष्ठ नागरिकाच्या घरी ऑनलाईन घडला आहे. सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) ज्येष्ठ नागरिकाची 35 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. (Pune Crime News)

याबाबत वंसत सिताराम मुंढे (वय-75 रा. हिमाली सोसायटी, एरंडवणे, पुणे) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी 92799XXXXX, 82087XXXXX, 98323XXXXX देवेश जोशी या नावाच्या मोबाईल धारकावर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत मुंढे यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन आला. समोरच्या व्यक्तीने देवेश जोशी बोलत असल्याचे सांगितले. तुमचे मागील महिन्याचे वीज बिल थकले असल्याचे सांगून त्यांना इलेक्ट्रीसीटी एपीके (Electricity Apk) नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानुसार मुंढे यांनी मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड (App Download) केले.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना व्हिडिओ कॉल (Video Call) करुन त्यांच्या डेबिट कार्डचा 16 अंकी नंबर व सिव्हीसी कोड घेतला.
डेबिट कार्डचा नंबर घेतल्यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 35 हजार रुपये परस्पर काढून घेत
फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नोकरीच्या आमिषाने 20 लाखांची फसवणूक, वाडगाव शेरीमधील घटना