Pune Crime News | गृहकर्ज मंजुरीच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक, मुंढवा परिसरातील प्रकार; महिलेवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बँकेतून तात्काळ गृहकर्ज मंजूर (Home Loan) करुन देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाची 5 लाख 42 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत व्यावसायिकाच्या केशवनगर येथील राहत्या घरी घडला. (Pune Crime News)

याबाबत मल्हारी मधुकर गवळी Malhari Madhukar Gawli (वय-33 रा. गायराण वस्ती, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सुवर्णा विश्वनाथ चिपाडे Suvarna Vishwanath Chipade (रा. त्रिमुर्तीनगर, शिरुर, पुणे) यांच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना नवीन सदनिका घ्यायची होती. त्यासाठी सुवर्णा चिपाडे यांनी बँकेतून तात्काळ कर्ज मिळवून देते, असे सांगून गृहकर्जासाठी लागणारी कागदपत्रे फिर्यादी यांच्याकडून घेतली. यानंतर स्टॅम्प ड्युटी आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) भरायची असल्याचे सांगून वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडून 5 लाख 42 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करुन घेतले.

मात्र, आरोपी चिपाडे यांनी कोणत्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी (Stamp Duty) भरली नाही.
तसेच गृहकर्ज मंजूर न करता पैशांचा अपहार करुन फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी
यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Pune Police) तक्रार अर्ज केला होता.
या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी सुवर्णा चिपाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक करपे (API Karpe) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पार्सल तर मिळालेच नाही पण खात्यातून गेले पाच लाख, आंबेगाव येथील घटना

Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 69 वी स्थानबध्दतेची कारवाई

कामावरुन काढून टाकल्याच्या कारणावरुन ऑफिसची तोडफोड, हडपसर येथील घटना