Pune Crime News | बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल; पिंपरी चिंचवडमधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बांधकाम व्यावसायिकाचे सही केलेले चेक चोरुन पैसे ट्रान्सफर करुन घेण्याचा प्रयत्न केला. तसेच बिल्डरच्या ऑफिसमधील कॉम्प्युटर मधील डाटा डिलीट करुन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात (Pune Police) एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च 2023 ते आज पर्यंत आकुर्डी येथील जय गणेश विजन (Jai Ganesha Vijan) येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत नितीन शंकर धिमधिमे (वय-42 रा. शुभश्री रेसीडन्सी, जय गणेश विजन, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन नितीन रघुनाथ मोरे (वय-28 रा. अजिंक्यतारा हौ.सोसायटी, रुपीनगर), संजय नारायण पाटील (वय-45 रा. पंचवटी सोसायटी, शरदनगर रोड, चिखली) व एका महिलेवर आयपीसी 403,408,417,420,426,381,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे आकुर्डी येथील जय गणेश विजन
येथे कार्यालय असून त्या कार्यालयात आरोपी काम करत होते. आरोपी नितीन मोरे याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन
करुन फिर्यादी यांनी ऑफिसमध्ये सह्या करुन ठेवलेले कोरे चेक चोरले. त्या चेकद्वारे नितीन मोरे याने 20 लाख रुपये संजय पाटील याच्या खात्यावर व 18 लाख 50 हजार रुपये आरोपी महिलेच्या बँक खात्यावर आर.टी.जी.एस द्वारे ट्रान्स्फर केले. हा प्रकार फिर्यादी नितीन धिमधिमे यांना समजला असता त्यांनी तातडीने बँकेत जाऊन ट्रान्झॅक्शन रद्द केल्याने रक्कम फिर्यादी यांच्या खात्यात परत जमा झाली. (Pune Crime News)

नितीन धिमधिमे यांनी आरोपी नितीन मोरे याच्या बाबत अधिक माहिती घेतली असता त्याने, कोरे चेक, फॉर्म, लेटरहेड,
बँक आयडी पासवर्ड, लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, कॅमेरा, शिक्के चोरल्याचे समजले. तसेच फिर्यादी यांच्या
ऑफिसमध्ये असलेल्या कॉम्प्युटरमधील डाटा डिलीट करुन कंपनीच्या झालेल्या व्यवहाराची माहिती फिर्यादी यांना न
देता आरोपींनी फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | टास्क देण्याच्या बहाण्याने गॅरेज व्यावसायिकाला 13 लाखांचा गंडा, दिघी परिसरातील घटना

Someshwar Foundation Pashan Pune | फराळ खरेदीसाठी नागरिकांचा उत्सुर्त प्रतिसाद ! ‘सनी’ज् फूड्स आणि सोमेश्वर फाउंडेशनचा उपक्रम