Pune Crime News | टास्क देण्याच्या बहाण्याने गॅरेज व्यावसायिकाला 13 लाखांचा गंडा, दिघी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जॉबचे आमिष दाखवून एका तरुणाला टेलिग्राम लिंक (Telegram Link) पाठवून त्याला ग्रुपमध्ये जॉईन करुन घेतले. त्यानंतर त्याला ऑनलाईन टास्क (Online Task) देऊन पैसे पाठवण्यास सांगून 13 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. हा प्रकार दिघी येथील आदर्शनगर मधील तरुणाच्या राहत्या घरी ऑनलाइन पद्धतीने 24 जून ते 30 जून या कालावधीत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत सोहन शत्रुघ्न प्रसाद (वय-29 रा. आदर्शनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार 82470XXXXX मोबाईल धारक, टेलिग्राम आयडी धारक तसेच विविध बँक खाते धारक यांच्यावर आयपीसी 420, 406 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोहन प्रसाद यांचे दिघी परिसरात गॅरेज आहे. त्यांच्या मोबाईलवर 82470XXXXX या मोबाईलवरुन मेसेज आला. यामध्ये मी शिवानी राऊत असून मी आई स्प्रोस्पेक्ट डिजीटल एजन्सीमध्ये कामाला असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडे फ्री लॉन्सीग मध्ये जॉब असून तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला फायदा होईल असे सांगून एक यूट्यूबची लिंक पाठवली. (Pune Crime News)

त्यानंतर फिर्यादी यांना टेलिग्रामवरती लिंक पाठवून त्यांना ग्रुपमध्ये जॉईन करुन घेतले.
फिर्यादी यांना वेगवेगळ्या रक्कमेचे टास्क देण्यात आले. त्यानंतर त्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे पाठवण्यास सांगितले.
त्यानुसार फिर्यादी यांनी सायबर चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने 13 लाख रुपये पाठवले.
पैसे घेतल्यानंतर सायबर चोरट्यांनी टास्क किंवा घेतलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक वाघमोडे (PI Waghmode) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून शाळेत गेला, मुलं चोरणारा समजून लोकांनी बेदम बदडलं; पुण्यातील घटना

Pune SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात जमावबंदी, विद्यापीठात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा आदेश

Hasan Mushrif On Raju Shetti | राजू शेट्टींच्या आंदोलनावर मुश्रीफांची प्रतिक्रिया, ”मला रात्रीची झोप लागत नाही, कर्ज इतके….”