Pune Crime News | फर्निचर विक्रेत्याची सव्वा लाखांची फसवणूक, पुणे कॅम्प परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | फर्निचरचे पैसे एन.एफ.टी केल्याचा स्क्रिन शॉट (Screen Shot) पाठवून एका फर्निचर विक्रेत्याची सव्वा लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आला. याप्रकरणी एकावर लष्कर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 7 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी पावणे अकरा ते पावणे एकच्या सुमारास पुणे कॅम्पातील सोलापुर बाजार येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत मकरंद कलींदर पवार (वय-46 रा. विद्यानगर लेन, नवी सांगवी, पुणे) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. तर पार्थ चव्हाण (रा. आयप्पा मंदिराजवळ, घोरपडी गाव, पुणे) याच्यावर आयपीसी 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मकरंद पवार यांचे पुलगेट बस स्टँड समोरील सोलापूर बाजार येथे लालको इंटेरिअर्स नावाचे फर्निचरचे (Lalco Interiors Furniture) दुकान आहे. 7 ऑगस्ट रोजी आरोपी पार्थ चव्हाण त्यांच्या दुकानात आला. त्याने फर्निचर पसंत करुन मोबाईलवरुन 1 लाख 23 हजार 869 रुपये एन.एफ.टी केल्याचा स्क्रिन शॉर्ट फिर्यादी यांना दाखवला. तसेच 10 हजार रुपये जास्त आल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले. आरोपीने पत्नी प्रसुती झाल्याचे सांगून फर्निचर अर्जंट पाहिजे असल्याचे सांगितले. तसेच मिलिट्री एरियामध्ये खासगी वाहनांना बंदी असल्याचे सांगून त्याने त्याच्या वाहनामध्ये फर्निचर घेऊन गेला. (Pune Crime News)

दरम्यान, फिर्य़ादी यांच्या बँक खात्यात आरोपीने पाठवलेले पैसे जमा झाले नसल्याने त्यांनी पार्थ चव्हाण याला संपर्क केला.
त्यावेळी त्याने गाडी चालवत आहे चेक करतो असे सांगून फोन बंद केला.
त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे पाठवल्याचा स्क्रिन शॉट पाहिला असता आरोपीने पैसे ट्रान्सफर न करता
फेक अकाउंटवर पैसे पाठवल्याचा स्क्रिन शॉट दाखवून सामान नेल्याचे लक्षात आले.
आरोपीने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर मकरंद पवार यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, 28 वर्षाच्या तरुणाला अटक; एरंडवणा येथील प्रकार

खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर वार, खडक परिसरातील घटना; तिघांना अटक

दुचाकीचा धक्का लागल्याच्या रागातून ब्लेडने वार, लोहियानगर मधील घटना