Pune Crime News | कार्ड इन्शूरन्स कॅन्सल करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक, हिंजवडीमधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तुमच्या क्रेडीट कार्डवर (Credit Card) कार्ड इन्शुरन्स (Card Insurance) असून तो कॅन्सल करुन देतो असे सांगून एका महिलेची 1 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. हा प्रकार 7 ऑगस्ट 2023 रोजी हिंजवडी येथे महिलेच्या घरी घडला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) सोमवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 90932XXXXX या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात आयपीसी 419, 420, 406 सह अयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरी असताना त्यांच्या मोबईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला.
समोरच्या व्यक्तीने कोटक महिंद्रा बँक, मुंबई येथुन बोलत असल्याचे महिलेला सांगितले.
त्याने तुमच्याकडे जे क्रडिट कार्ड आहे त्यावर कार्ड इन्शुरन्स आहे. त्याकरिता तुमच्या कार्डवरुन दरमहा 2950 रुपये
चार्जेस लागतील. ते तुम्हाला कॅन्सल करायचे असेल तर मी कॅन्सल करुन देतो असे सांगितले. महिलेचा विश्वास संपादन करुन सायबर चोरट्याने त्यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडीट कार्डवरुन एक लाख 80 हजार रुपये परस्पर काढून घेत आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, ओबीसींचे नेते आमच्याविरोधात षडयंत्र रचत आहेत, मराठा नेत्यांनी…

Modi Govenment | मोदी सरकारची दिवाळी भेट, सर्वसामान्यांसाठी स्वस्तात ‘भारत आटा’; जाणून घ्या किंमत आणि इतर गोष्टी…