Pune Crime News | ट्रेडिंगमधून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यातील तरुणीची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शेअर बाजारातील (Stock Market) गुंतवणूक (Investment) आणि जादा टक्केवारीने परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. अशीच घटना पुण्यातील कॅम्प परिसरात घडली आहे. तरुणीला टेलिग्रामवर लिंक पाठवून ऑनलाईन ट्रेडिंगमधून (Online Trading) जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून 86 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime News)

याबाबत रुखसार अखरत शेख (वय-29 रा. पुणे कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेलिग्राम अकाउंट धारक राजेश दास व नंदिनी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 420, 34 सह आयटी अॅक्ट कलम 66 क,डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 20 जुलै 2022 ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत फिर्यादी यांच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुखसार शेख यांना टेलिग्राम धारक राजेश दास व नंदिनी यांनी संपर्क साधला.
त्यांना एक लिंक पाठवून त्या लिंकवर ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले.
गुंतवलेल्या पैशांवर मोठा परतावा देण्याचे आमिष सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना दाखवले.
त्यानुसार फिर्यादी यांनी 86 हजार 800 रुपये पाठवले. मात्र, सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना परतावा किंवा त्यांनी
पाठवलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रुखसार शेख यांनी लष्कर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेळके (PI Shelke) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | महापालिका प्रशासनाच्या अनियोजीत कामांचा भुर्दंड ‘लाखांमध्ये’

पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमावर FIR

Pune Crime News | कंपनीत पैसे गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची कोट्यवधीची फसवणूक, पुण्यातील प्रकार