Pune PMC News | महापालिका प्रशासनाच्या अनियोजीत कामांचा भुर्दंड ‘लाखांमध्ये’

ADV

उड्डाणपुलाखालील ‘फ्लॉवर बेड’च्या रक्षणासाठी लाखो रुपये खर्चून लोखंडी जाळी बसविण्यात येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | महापालिकेच्या विकास कामातील त्रुटीचा उत्तम नमुना समोर आला आहे. अगोदर उड्डाणपुल (Flyover) उभारला. यानंतर पुलाखाली सुशोभीकरणासाठी फ्लॉवर बेड तयार करण्यात आले. परंतू अल्पावधीतच पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या झोडपट्टयांमधील उपद्रवींकडून फ्लॉवर बेडमधील झाडे तोडणे, माती काढून नेणे, वीजेच्या साहित्याची नासधूस सुरू झाल्याने आता सुमारे ५० लाख रुपये खर्चून दोन्ही बाजूंनी लोखंडी जाळ्या लावून फ्लॉवर बेडचे जतन करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्थानीक परिस्थिती माहिती असताना कुठल्याही नियोजनाशिवाय सुशोभीकरणाचा घाट घालून लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याबाबत सुजाण नागरिक संताप व्यक्त करत आहेत. (Pune PMC News)

सेव्हन लव्हज चौकाकडून मार्केटयार्डकडे जाणार्‍या नेहरू रस्त्यावर मुठा उजवा कालव्यावरील पुलापासून गुलटेकडी येथील गिरीधर भवन चौकापर्यंत उड्डाणपुल उभारण्यात आला आहे. २०२१ मध्ये या पुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. या पुलाच्या एका बाजूला डायस प्लॉट झोपडपट्टी असून दुसर्‍या बाजूला इंदिरानगर (खड्डा) झोपडपट्टीचा बराचसा भाग आहे. पुल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर काही महिन्यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाने सुशोभीकरणासाठी पुलाखालील दुभाजकामध्ये माती भरून फ्लॉवर बेड तयार केले. परंतू अल्पावधीतच येथील झाडांची नासधूस करणे, पाण्याचे पाईप तोडून नेणे, माती उकरून नेणे, याठिकाणी असलेल्या वीज साहित्याची मोडतोड असे प्रकार सुरू झाले. एवढेच नव्हे तर याठिकाणी कपडे देखिल वाळू घालण्यात येत आहेत. पुलाचे काम केलेल्या ठेकेदाराने पुढाकार घेउन तीन ते चार वेळा याठिकाणी दुरूस्ती केली. परंतू परिस्थितीमध्ये कुठलिच सुधारणा होत नाही.

दरम्यान, या उड्डाणपुलाच्या कामासाठी पुढाकार घेतलेले स्थानीक माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला पत्र देउन या फ्लॉवर बेडच्या संरक्षणासाठी दोन्ही बाजूला लोखंडी जाळी उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनानेही येथील विद्युत विभागाच्या कामासाठी असलेल्या निधीतून लोखंडी जाळी लावण्यासाठीची ५० लाख रुपयांची निविदा काढली आहे. यावरून आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. स्थानीक परिस्थिती पाहून त्या पद्धतीचे सुशोभीकरण करणे अपेक्षित असताना प्रशासन कोणाच्या हट्टापायी जाळी लावण्याचा घाट घालत आहे. फ्लॉवर बेडचे नुकसान होउ नये यासाठी लोखंडी जाळी लावल्यानंतर त्या फ्लॉवर बेडची निगा राखणारे कर्मचारी तेथे कसे जाणार, तेथे कचरा झाल्यास त्याची स्वच्छता कशी केली जाणार. आतमध्ये जाण्यासाठी जागा ठेवल्यास अन्य उपद्रवी लोकही त्या जागेतून प्रवेश करू शकणार असल्याने सगळे मुसळ केरामध्ये जाणार आहे. हे सर्व माहिती असताना प्रशासन उधळपट्टीसाठी अट्टाहास का करत आहे? असाही सवाल या प्रभागातील सुजाण नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

म्युरल्सचेही नियोजन ?
या उड्डाणपुलाखाली म्युरल्स बसविण्यासाठी एक माननीय प्रयत्नशील आहेत. यासाठीचे काही म्युरल्सही तयार करून
घेतले आहेत. येत्या काही काळात निविदा प्रक्रिया राबवून तेच म्युरल्स लावण्याचे नियोजन देखिल पाईपलाईनमध्ये आहे.
यामुळे केवळ कुठल्याही नियोजनाशिवाय सुशोभिकरणासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप स्थानीक
करू लागले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील वानवडी परिसरातील बीटी कवडे रोडवर एकावर गोळीबार, प्रचंड खळबळ

जाहिरात होर्डींग्जच्या बदल्यात स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरूस्ती ! महापालिकेने प्रायोगीक तत्वावर काढली चार स्वच्छतागृहांची निविदा

सुरक्षारक्षकांची फौज तैनात असताना ‘मार्केटयार्डात’ शेतमालाच्या चोर्‍या वाढल्या; शेतकरी व विक्रेते हवालदील