Pune Crime News | गॅस एजन्सीचालकाला धमकावून खंडणी उकळणार्‍या गुंडांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | गॅस एजन्सीच्या (Gas Agency) डिलिव्हरी बॉयला अडवून गॅस चोरुन नेणारे तसेच एजन्सी मालकाला धमकावून खंडणी (Extortion Case) उकळणार्‍या दोघा गुंडांना उत्तमनगर पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Crime News)

अमोल परशुराम रायकर Amol Parasuram Raikar (वय ३०, रा. भैरवनाथनगर, कोंढवे धावडे) आणि सोमनाथ उद्धव कोमिले Somnath Uddhav Komile (वय३२, रा. गोसावी वस्ती, रामनगर, माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत चंदनसिंग भवरसिंग भाटी (वय २३, रा. डोणजे) यांनी उत्तमनगर पोलिसांकडे (Uttamnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०२/२३) दिली आहे. हा प्रकार कोपरे गावात ३ ते ५ ऑक्टोंबर दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पृथ्वी एच पी गॅस एजन्सी (Prithvi HP Gas Agency),
अंबिका गॅस एजन्सी (Ambika Gas Agency), अतिष गॅस सप्लायर्स (Atish Gas Suppliers),
गोल्ड मॅन एच पी गॅस एजन्सी (Goldman HP Gas Agency) व भरेकर गॅस एजन्सी कोथरुड
(Bharekar Gas Agency Kothrud) या गॅस एजन्सीच्या डिलेव्हरी बॉयच्या सिलेंडर वाहतूकीच्या गाड्या अडविल्या.
त्यांना शिवीगाळ व दमदाटी करुन त्यांच्याकडून ३३०० रुपयांचा गॅस चोरुन नेला. त्यांच्या मालकांना दरमहा १५ हजार
रुपये हप्ता मागून त्यांच्याकडून ५ हजार रुपयांची खंडणी (Ransom Case) उकळली. पोलिसांनी दोघांना अटक केली
असून सहायक पोलीस निरीक्षक पवार (API Pawar) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Mohan Joshi – Shivaji Nagar ST Stand | शिवाजीनगर एसटी स्थानक 15 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा मुख्य मंत्र्यांना अडवू; माजी आमदार मोहन जोशी यांचा इशारा

IPS Ritesh Kumar-Sasoon Hospital | ससूनमधील गार्डवर वरिष्ठ पोलिसांची निगराणी, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले ‘हे’ आदेश

Chandrakant Patil – Pune Guardian Minister | पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Maharashtra Govt-Pune PMC | आरोग्य, शिक्षण विभागाला पूर्णवेळ प्रमुख नसताना लेखा व वित्त विभागासाठी शासनाने अतिरिक्त मुख अधिकारी नेमला

NHRC On Deaths In Govt Hospitals In Maharashtra | राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली दखल, राज्य सरकार व मुख्य सचिवांना नोटीस