Chandrakant Patil – Pune Guardian Minister | पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil – Pune Guardian Minister | पुण्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. अजित पवार यांची पालकमंत्रीपदावर नियुक्ती झाल्यानंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. गुरुवारी (दि.5) पुण्यात तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलणं अपेक्षित होते. मात्र त्यांनी माध्यमांवर आणि पत्रकारांवर कोणताही राग नाही, असं म्हणत पालकमंत्रीपदाबाबत बोलणं टाळलं. त्यांच्या या कृतीतून ते नाराज आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Chandrakant Patil – Pune Guardian Minister)

पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर मावळते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी रात्री उशीरा पालकमंत्री म्हणून गुरुवारी जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक असल्याचा निरोप देऊन बैठक घेतली. अजित पवार शुक्रवारी पुण्यात जिल्हा नियोजनाची बैठक घेण्याची शक्यता आहे. मात्र, त्या आधीच चंद्रकांत पाटील यांनी वेगळ्या नावाने ही बैठक घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून या बैठकीची चर्चा होत आहे. (Chandrakant Patil – Pune Guardian Minister)

पुण्याचे नवनियुक्त पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात शुक्रवारी होण्याची शक्यता असलेल्या बैठकीला जिल्हा नियोजन बैठक असं नाव असेल तर चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी बोलवलेल्या बैठकीला जिल्हा वार्षिक योजना कामकाज आढावा बैठक असं नाव दिलं आहे. या बैठकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातील विकास निधी संदर्भात चर्चा झाली.

चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून मंजूर केलेल्या 400 कोटी रुपयांचा विकासनिधी अजित पवारांनी
अर्थमंत्री बनताच अडकवून ठेवला होता. मात्र अजित पवार समर्थक आमदारांना प्रत्येकी दहा कोटी रुपयांचा विकास
निधी ग्रामीण विकास निधी आणि समाजकल्याण विभागाचा प्रत्येकी पाच कोटी निधी मंजूर करण्यात आला होता.
त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

चंद्रकांत पाटीलच आपला नेता…

चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेले पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर पुण्यात भाजप
नेत्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. पुण्यात अनेक भाजप नेत्यांनी चंद्रकांत पाटील हेच आपले नेता असल्याचे
म्हटले आहे. अजित पवारांना पालकमंत्री करणं हे चांगलं आहे. पक्षाच्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत.
परंतु आमचा नेता चंद्रकांत पाटीलच असेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समोर ठेवून पक्षश्रेष्ठींनी
हा निर्णय घेतला असल्याचे पुणे भाजप अध्यक्ष धीरज घाटे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Mohan Joshi – Shivaji Nagar ST Stand | शिवाजीनगर एसटी स्थानक 15 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा मुख्य मंत्र्यांना अडवू; माजी आमदार मोहन जोशी यांचा इशारा