Pune Crime News | कोयत्याने वार करुन अल्पवयीन टोळक्याने तोडला हात; पोलिसांकडे तक्रार केल्याने कात्रजमधील धक्कादायक घटना

पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून पोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरुन अल्पवयीन टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार करुन एकाचा हात तोडण्याची धक्कादायक घटना कात्रज (Katraj News) येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) तिघा अल्पवयीनांसह ८ जणांवर खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

अखिलेश ऊर्फ लाडप्पा चंद्रकांत कलशेट्टी (Akhilesh alias Ladappa Chandrakant Kalshetty) असे या तरुणाचे नाव आहे. सुदैवाने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन त्याचा पंजा पुन्हा जोडला.

याबाबत अभिजीत दुधनीकर Abhijeet Dudhanikar (वय २३, रा. गोकुळनगर, कात्रज) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station ) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निखिल ऊर्फ रोहित गोरख दिनकर Nikhil alias Rohit Gorakh Dinkar (वय १९, रा. स्वामी समर्थनगर, गोकुळनगर, कात्रज) याला अटक (Arrest) केली आहे. रोहित बोद्रे (Rohit Bodre), प्रेम गुंगारग (Prem Gungarag), युवराज देवकाते (Yuvraj Devkate) व त्यांच्या साथीदारासह तिघा अल्पवयीनांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सुखसागरमधील स्मार्ट मेन्स पार्लर समोर बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडप्पा व रोहीत बोद्रे व इतरांमध्ये जुनी भांडणे आहेत. त्यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरुन एकमेकांत खुमखुमी होती व वाद चालू होते. फिर्यादी व लाडप्पा हे २२ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता दुचाकीवरुन जात असताना के एन के सोसायटीकडून सुखसागरनगरकडे जात असताना गणेश मेडिकलसमोर रोहित बोद्रे, प्रेम गुंगारगे हे दोन बाईकवरुन हातात धारदार शस्त्रे घेऊन पास झाले. यांना पाहून त्यांनी दुचाकी वळून पाठलाग करु लागले. वाटेत अचानक रिक्षा आल्याने लाडप्पा याने दुचाकी हळू केली. तेव्हा आरोपींनी त्यांना घेरले. रोहित बोद्रे याने शिवीगाळ करुन हातातील शस्त्रे फिरवून “साल्या तुम्ही केस करता का आमच्यावर थांबा आता तुमचा मर्डर करतो,” असे म्हणून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीवर वार करण्यास सुरुवात केली. त्याने डाव्या हाताने वार चुकविण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा त्यांच्या ढोपरावर मार लागला. डाव्या हातातून रक्त येऊ लागले.
तो घाबरुन खंडोबा मंदिराच्या दिशेने पळून जाऊ लागला. तेव्हा इतरांनी त्यांला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दोघांनी त्यांच्या हातातील कोयत्याने लाडप्पाच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा त्याने वार चुकवून हातावर घेतला. त्यात त्याच्या हाताचा मनगटावर वार बसला.
हा वार इतका जोरात होता की, त्याचे पंजा मनगटापासून तुटला. उजव्या हाताला जखम झाली.
हा प्रकार पाहून लोक सैरावैरा पळू लागले. टोळकेही पळून गेले. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी दोघांना
भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

तेथील डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन लाडप्पाचे तुटलेला पंजा पुन्हा जोडला आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title :- Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna Crime News | जमिनीच्या वादातून आरोपीकडून सावत्र भावाची हत्या; जालन्यामधील घटना

Pradeep Sarkar Pass Away | दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे अल्पशा आजाराने निधन