Pune Crime News | धनकवडी, नऱ्हे परिसरात घरफोडी, 30 लाखांचा ऐवज लांबविला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शहराच्या वेगवेगळ्या भागात सदनिकांचे कुलुप तोडून चोरट्यांनी 30 लाख रुपयांचा ऐवज लांबविला. धनकवडी आणि नऱ्हे भागात या घटना घडल्या. याप्रकरणी भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth Police Station) आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत युवराज यादवराव निगडे (वय-38) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवराज निगडे धनकवडी परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी निगडे यांच्या घराचे मेन गेटचे लॉक तटून घरात प्रवेश केला. बेडरुममधील कपाटाचे लॉक तोडून कपाटातील 2 लाख 70 हजार रुपये रोख (Cash), 3 लाख 60 हजार रुपये किमतीचे 12 तोळे सोन्याचे दागिने (gold Jewelry) 50 हजार रुपयांचे चांदीच्या वस्तु असा एकूण 6 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक रसाळ (API Rasal) तपास करत आहेत. (Pune Crime News)

नऱ्हे मधील मानाजीनगर परिसरात असलेल्या स्प्रिंगफील्ड सोसायटीमधील (Springfield Society Narhe) सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाकडी कपाटातील 10.4 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 19 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत शशिकांत गोरख मोरे (वय-31) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक यादव (API Yadav) तपास करत आहेत.

नऱ्हे परिसरातील तुळजाभवानी मंदीराजवळ असलेल्या एका बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील बंद
घराचे कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने (Gold Ornaments), चांदीचे दागिने (Silver Ornaments)
असा एकूण 2 लाख 82 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
याबाबत समीर संजय दिक्षीत (वय-32) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लाड करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Edible Oil Prices | सणासुदीच्या आधी गृहिणींसाठी आनंदाची बातमी: तेलाच्या किमतीबाबत आली अपडेट

Pune Crime News | खोटे कागदपत्र तयार करुन जागा बळकावली, 8 कोटींची फसवणूक करणाऱ्या दोघांवर FIR;
पर्वती परिसरातील घटना