पुणे : Pune Crime News | पत्नीने घटस्फोटासाठी (Divorce) अर्ज केल्याचा राग मनात धरुन पार्किंगमधील गाड्यांना पतीने आग लावली. त्यात एक कार, रिक्षा आणि ४ दुचाकी जळून खाक झाल्या. (Pune Crime News)
याप्रकरणी एलिना आयझीक जेकब (वय २४, रा. आलिफ टॉवरसमोर, आश्रफनगर, कोंढवा) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. २७२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी (Pune Police) टेनेन्स डॉमनिक जॉन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आश्रफनगरमध्ये सोमवारी पहाटे ५ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा पती टेरेन्स जॉन याच्याविरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दिला आहे.
त्याचा राग मनात धरुन फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणी पार्किंगमधील फिर्यादीच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून तिला आग लावली.
या आगीमुळे आजूबाजूच्या ४ दुचाकी, एक कार व रिक्षा जळून खाक झाल्या. सहायक पोलीस निरीक्षक भाबड तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | In anger over filing for divorce, husband doused vehicles with petrol and set them on fire; In the incident in Kondhwa, a car, a rickshaw and 4 two-wheelers got burnt
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | संकष्टी चतुर्थीला ‘दगडुशेठ’जवळ ‘वसुली’चा प्रयत्न करणारा पोलीस कर्मचारी निलंबित