Pune PMC Subsidy To Convert Rickshaws Into E-Rickshaws | पुण्यातील रिक्षाचालकांसाठी मोठी खुशखबर ! रिक्षांचे ई रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी महानगरपालिकेकडून 25 हजारांचे अनुदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Subsidy To Convert Rickshaws Into E-Rickshaws | पुण्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका आता रिक्षांचे ई रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी तब्बल 25 हजारांचे अनुदान देणार असल्याची माहिती मनपाचे आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली आहे. (Pune PMC Subsidy To Convert Rickshaws Into E-Rickshaws)
सर्वत्र इंधनाच्या किंमती वेळोवेळी वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे.
त्यामुळे राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन कार्यक्रमानुसार मनपाने पुण्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरला प्रोत्साहन देण्यासाठी एक अनोखी अनुदान योजना राबविण्याचे ठरवले आहे.
आता ई रिक्षा रस्त्यावर आणण्यासाठी पुणे मनपा 25 हजार रूपयांचे अनुदान देणार आहे.
हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी 3 चाकी अॅटो रिक्षांना सीएनजीचे किट बसविण्यासाठी 12 हजार रूपयांचे अनुदान पुणे मनपाकडून देण्यात येत होते.
प्रत्येक रिक्षाला ई-रिक्षामध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे 65 ते 70 हजार रूपये खर्च येतो.
त्यापैकी मनपा प्रत्येक रिक्षासाठी 25 हजार रूपये देणार आहे.
उर्वरित रक्कम रिक्षा मालकाला द्यावी लागणार आहे.
Web Title :- Pune PMC will give a subsidy of 25 thousand to convert rickshaws into e-rickshaws
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update