Pune Crime News | बसमधील प्रवाशांचे मोबाईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी बंडगार्डन पोलिसांकडून गजाआड, 2 लाखांचे मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या (Mobile Thieves) आंतरराज्यीय टोळीला (Interstate Mobile Thieves Gang) बंडगार्डन पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. अटक (Arrest) करण्यात आलेल्या चार जणांकडून 2 लाखांचे 12 मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई (Pune Crime News) मालधक्का रोडवर करण्यात आली आहे.

सतीश व्यंकटेश माधगोलू (वय-22 रा. उपलपेटा, जि. हैदराबाद, तेलंगणा-Telangana), जगदीश भास्करराव आवला (वय-22 रा. तुरकनाडी वलसा, ता. जीएम वलसा, जि. पारथीपुरम, आंध्रप्रदेश-Andhra Pradesh), विक्रम शिवनाथ दास (वय-22 रा. उपलपेटा, जि. हैदराबाद, तेलंगणा), गणेश कृष्णा गोड (वय-22 रा. बी.के. बहरा, जि. महासमुंद, छत्तीसगड-Chhattisgarh) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) 5 ऑगस्ट रोजी आयपीसी 379,34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

फिर्यादी व त्यांचे चुलत भाऊ घरी जाण्यासाठी अलंकार चौकातील पीएमटी बसस्टॉपवरुन (PMP Bus Stop) केशवनगर येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत होते. त्यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या खिशातून दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची फिर्याद बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार मनोज भोकरे (Police Manoj Bhokare), शिवाजी सरक (Police Shivaji Sark) यांना माहिती मिळाली की, पुणे स्टँडसमोर मालधक्काकडे जाणाऱ्या रोडवरील अंडाभुर्जीच्या हातगाडीजवळ चार जण थांबले असून ते मोबाईल विकत घेण्याबाबत विचारणा करत असून मोबाईल चोरीचे असल्याचा संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 12 मोबाईल ताब्यात
घेऊन मोबाईलबाबत चौकशी केली असता पुणे शहातील विविध भागातून चोरल्याची कबुली दिली.
आरोपींनी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन तर येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerwada Police Station) हद्दीतून
एक मोबाईल चोरल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपींकडून 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचे 12 मोबाईल जप्त केले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग आर.एन. राजे
(ACP R.N. Raje), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील (Sr PI Santosh Patil), पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते
(PI Ashwini Satpute) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे (PSI Ravindra Gawde),
मोहन काळे अनिल कुसाळकर, संजय वणवे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, तुळशीराम घडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cyber Crime News | पुणे : गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक