Pune Crime News | पुण्यात पकडलेल्या ‘त्या’ दोन दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime News | पुणे शहरातील कोथरुड परिसरात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांकडे (Terrorists Arrested in Pune) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) चौकशी सुरु करण्यात आली आहे. मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी Mohammad Yunus Mohammad Yaku Saki (वय -24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान Mohammad Imran Mohammad Yusuf Khan (वय-23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा-Kondhwa मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) असे पकडण्यात आलेल्या दोन दहशवाद्यांची नावे असून दहशतवादाच्या मॉड्युलचाच ते एक भाग असल्याचे तपासात समोर आले आहे. (Pune Crime News)

मिडिया रिपोर्टनुसार पकडण्यात आलेले हे दोन दहशतवादी मॉड्युलसाठी स्लीपर सेल म्हणून काम करत होते. तर फरार झालेला मोहम्मद शहनवाज आलम Mohammad Shahnawaz Alam (वय 31) हा या स्लीपर सेलचा (Sleeper Cell) मास्टर माईंड असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात दुचाकी चोरायचे

हे तिघे पुण्यात दुचाकी चोरत होते. दुचाकी चोरत असताना दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता ते देशविरोधी काम करत असल्याचे समोर आले. दहशतवादी कारवायांसाठी दुचाकी चोरत (Two wheeler Thief) होते. मात्र, या दुचाकी चोरून ते कशाप्रकारे कट रचत होते याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.(Pune Crime News)

दहशतवादी पार्श्वभूमी

पोलिसांनी मिडियाला दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोघे दहशतवादी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांनी राहत्या परिसरातून दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला नाही. जेणेकरुन पकडले गेल्यास स्थानिक पोलिसांच्या नजरेत येणार नाही. त्यामुळे ते तिघे ज्या ठिकाणी राहत होते तेथून लांबचा परिसर चोरीसाठी निवडत होते. काही वर्षापूर्वी पुण्यात चोरीच्या गाड्यांचा ब्लास्ट करण्यात आला होता. त्यांनाही दुचाकीचा ब्लास्ट करायचा होता असा संशय पोलिसांना आहे.

15 महिन्यापासून पुण्यात वास्तव्य

पकडण्यात आलेल्या दोघांकडे पोलीस चौकशी करत आहेत. हे दोन दहशतवादी ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेची (ISIS Terrorist Organization) उपसंघटना ‘सुफा’ या संघटनेचे (Sufa Organization) सदस्य असल्याचा संशय आहे. 2022 मध्ये मार्च महिन्यात राजस्थानच्या चित्तोगडमध्ये याच तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी पावडर जप्त केली होती. त्यांना पकडून देण्यासाठी पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मागील 15 महिन्यांपासून ते पुण्यातील कोंढवा परिसरात लपून बसले होते. एनआयएच्या (National Investigation Agency (NIA) पथकाने शुक्रवारी कोथरुड भागास भेट दिली. खान आणि साकी कोंढव्यात ज्या भागात राहत होते, त्या भागाची देखील पाहणी एनआयएच्या पथकाने केली.

NIA-ATS पथकाकडून तपास सुरु

पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी
न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 25 जुलै पर्यंत
पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या दहशतवाद्यांकडे कसून चौकशी सुरु आहे.
तसेच केंद्रीय तपास यंत्रणा ही तपासासाठी पुण्यात दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर एनआयए दिल्ली
(NIA Delhi), मुंबई (NIA Mumbai), जयपूरची (NIA Jaipur)
पथके आणि महाराष्ट्र एटीएसचे पथक (Maharashtra ATS)
पुण्यात दाखल झाले आहे. त्यांच्याकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Allu Arjun | अल्लू अर्जुनने केला पुष्पा 2 चित्रपटाचा डायलॉग रिव्हिल;  
यावेळी पुष्पा फ्लॉवर नाहीतर आहे…

Pune Crime News | पतीच्या व्यवसायातील अपयशामुळे होणार्‍या छळाला
कंटाळून विवाहितेची आत्महत्या; लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल