Pune Crime News | पतीच्या व्यवसायातील अपयशामुळे होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | व्यवसायात पतीला तोटा (Business Loss) झाल्याने पत्नीने माहेरहून पैसे आणावेत, यासाठी वारंवार मारहाण (Beating) करुन मानसिक (Mental Torture) व शारीरीक छळ (Physical Torture) केल्याप्रकरणी एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. (Pune Crime News)

स्रेहल मयुर चौधरी Srehal Mayur Chaudhary (वय २९,रा. नायगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी (Lonikalbhor Police Station) मयुर गोरख चौधरी Mayur Gorakh Chaudhary (वय ३५, रा. नायगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० जुलै रोजी घडला होता.

याबाबत तिचा भाऊ इंद्रजित नारायण कांचन (वय २४, रा. उरुळी कांचन) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयुर चौधरी याचा सिमेंटचे पाईप (Cement Pipe) बनविण्याचा व्यवसाय आहे. त्याला या व्यवसायात तोटा आला होता. त्यामुळे त्याने सतत माहेरहून पैसे घेऊन येत, अशी मागणी स्रेहलकडे करत होता.

शेवटी तिच्या भावाने २ लाख रुपयांची जर्सी गाय त्यांना दिली. तिचे दुध विकून घर चालवा, असे सांगितले.
त्यानंतरही त्याची भूक वाढत गेली. माहेरहून पैसे आणण्यासाठी तो तिला मानसिक व शारीरीक त्रास देत होता.
तिला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देत होता.
या छळाला कंटाळून स्रेहल हिने २० जुलै रोजी रात्री पावणेदहा वाजता राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस उपनिरीक्षक देशमुख (PSI Deshmukh) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | नळावरील भांडणात पोटावर लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात;
लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघोलीमधील घटना