Pune Crime News | पुण्यातील चामुंडा माता मंदिरातील दागिन्यांची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील कात्रज परिसरातील भिलारेवाडी येथे असलेल्या चामुंडा माता मंदिरातील (Chamunda Mata Temple) देवीच्या अंगावरील लाखो रुपयांचे दागिने (Goddess Ornaments) चोरून नेल्याची (Theft) घटना घडली आहे. हा प्रकार (Pune Crime News) मंगळवारी (दि.22) मध्यरात्री घडला असून बुधवारी (दि.23) पहाटे हा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत मंदिराचे पुजारी (Priest) रोशन ऋषीराज दाहाल Roshan Rishiraj Dahal (वय-33 रा. भिलारेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात आयपीसी 454, 457, 380 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरातील भिलारेवाडी येथील पेट्रोल पंपासमोर चामुंडा माता मंदिर आहे.
मंदिराचे पुजारी रोशन दाहाल यांनी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मंदिराचे दार कुलुप लावून बंद केले.
त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या दाराचे कडी-कोयंडा उचकटून मंदिरात प्रवेश केला.
चोरट्यांनी देवीच्या अंगावरील 1 लाख 12 हजार 50 रुपयांचे दागिने चोरून नेले.

पुजारी रोशन दाहाल हे बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास मंदिरात आले असता मंदिरात चोरी
झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग (Swargate Division)
नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior PI Vijay Kumbhar) यांनी घटनास्थळी भेट दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात (PSI Atul Thorat) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | ‘वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा निर्णय, पक्षात फूट पडलेली नाही’, शरद पवारांच्या नव्या गुगलीने राजकीय चर्चांना उधाण (व्हिडीओ)

Post Office | पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटचे आता नवीन नियम, काय-काय बदलले, जाणून घ्या

25 August Rashifal : मेष आणि मिथुनसह या तीन राशीवाल्यांसाठी दिवस आहे खास, वाचा दैनिक भविष्य