Pune Crime News | कोंढवा पोलिसांकडून मंदिरातील घंटा चोरी करणार्‍या रिक्षा चालकास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोंढवा परिसरातील भैरवनाथ मंदिरामधुन (Bhairavnath Mandir Kondhwa) घंटा चोरी करणार्‍या रिक्षा चालकास पोलिसांनी अटक केली आहे. त्याने पैशाची आवश्यकता असल्याने चोरी केल्याचे कबुल केले आहे. (Pune Crime News)

 

सोहेल इलियाज शेख Sohail Ilyaz Shaikh (25, रा. वडारवाडी, गोलंदाज चौक, शिवाजीनगर, पुणे – Shivaji Nagar Pune) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भैरवनाथ मंदिरातून घंटा चोरी गेल्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे मंदिरच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासत (CCTV Footage) असताना एकजण घंटा चोरी करून रिक्षामधून घेऊन जात असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती काढली. रिक्षा मालकाचे नाव समजल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्याने सदरील रिक्षा सोहेल इलियाज शेख याला शिपवर चालविण्यास दिल्याचे सांगितले. दरम्यान, सोहेल हा भाडे सोडण्यासाठी लुल्लानगर भागात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मंगळवारी सापळा रचुन त्याला अटक केले आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjankumar Sharma), सहाय्यक पोलिस आयुक्त एस.बी. साळवे (ACP S.B. Salve) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले (PI Sanjay Mogale), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले (PI Sandeep Bhosale)
यांच्या सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Survase),
पोलिस अंमलदार अमोल हिरवे, सुहास मोरे, राहुल थोरात,
गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, राहुल रासगे आणि विकास मरगळे यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Kondhwa police arrested a rickshaw driver Sohail Ilyaz Shaikh who stole temple bells

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा