Pune Crime News | मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime News | मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना कोंढवा पोलीसांनी (Pune Police) 24 तासात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन सुरज मुकुंद उगले (वय- 20 रा. शिवनेरी नगर, कोंढवा, पुणे) याला अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत मयुर शिवाजी कोऱ्हाळे (वय-23 रा. शिवनेरी नगर, कोंढवा बु.) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन पोलिसांनी तीन जणांवर आयपीसी 394, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 21 नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास शिवतिर्थ अपार्टमेंट समोर, शिवनेरी नगर येथे घडली होती. (Pune Crime News)

मयुर कोऱ्हाळे हे त्यांच्या मामाच्या मुलासबोत दुकानात जात होते. त्यावेळी त्यांच्या तोंडओळखीच्या आरोपींनी विनाकारण शिवीगाळ केली. याचा जाब विचारला असता आरोपींनी मयुर यांच्या नाकावर ठोसा मारुन नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. तसेच फिर्यादी यांच्या हातीतील 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकून नेला. तर इतर आरोपींनी पाठीचा चावा घेऊन काठीने बेदम मारहाण केली होती. तसेच फिर्यादी यांच्या मामाच्या मुलाला देखील मारहाण केली होती.

कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी तपास पथकाला दिले होते. तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील व त्यांचे पथक आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस हवालदार सतीश चव्हाण व विशाल मेमाणे यांना आरोपी कान्हा हॉटेल चौकात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले. यापैकी दोन अल्पवयीन आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त शाहूराव साळवे (ACP Shahurao Salve), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior PI Santosh Sonwane) ,

पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (PI Sanjay Mogle),
पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले (PI Sandeep Bhosle)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील (API Dinesh Kumar Patil),
सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे (API Lekhaji Shinde),
पोलीस अंमलदार निलेश देसाई, विशाल मेमाणे, लवेश शिंदे, सतीश चव्हाण, लक्ष्मण होळकर,
संतोष बनसुडे, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक प्रकार, UPSC करणाऱ्या तरुणीचा शिक्षकाकडून विनयभंग