Pune Crime News | घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या परराज्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा कोंढवा पोलिसांकडून पर्दाफाश, 7 गुन्हे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरासह ग्रामीण भागात घरफोडी (Burglary), वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या परराज्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी (Pune Police) पर्दाफाश केला आहे. आरोपींनी पुणे शहर (Pune City) आणि ग्रामीण (Pune Rural) भागात चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Pune Crime News) आरोपीकडून सात गुन्हे उघडकीस आले असून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोंढवा पोलिसांनी ही कारवाई 21 जून रोजी कान्हा हॉटेल चौकात केली.

 

कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले (PI Sandeep Bhosale) यांना माहिती मिळाली की, परराज्यातुन येऊन पुण्यात घरफोडी करणारी टोळी सासवड भागातील चांभळी गावात राहत असून टोळीचा प्रमुख कान्हा हॉटेल चौकात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुरेंद्र असलारामजी चौधरी Surendra Aslaramji Chaudhary (वय-28 रा. मुपो सौजाद, ता. मारवाडी, जि. झालोर) याला ताब्यात घेतले. (Pune Crime News)

 

पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने कोंढवा येथील अजमेरा पार्क येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच प्रथम प्रेस्टिज कॉम्प्लेक्स समोरून इको कार (एमएच 12 एन.यु.337), भोसरी येथील मोशी चौकातील पाटसकर हॉस्पिटल समोरुन बोलेरे पिकअप (एम.एच. 12 के.पी. 4544), मंचर तालुक्यातील चांडोली खु गावातील किराणा दुकान, लोणीकंद भागातील गुरुकृपा ट्रेडर्स, यवत भागातील सहजपुर फाट्या जवळील मारुती सुझुकी शो-रुम (Maruti Suzuki Showroom) मधील स्विफ्ट कार (एमएच 12 केई 455) चोरल्याची कबुली दिली. आरोपीने नेमाराम उर्फ डौलाराम चौधरी (Nemaram alias Daularam Chaudhary), भुंडाराम उर्फ राजु चौधरी (Bhundaram alias Raju Chaudhary) यांच्या मदतीने गुन्हे केल्याचे चौकशीत सांगितले.

आरोपीकडून रोख रक्कम, तीन लाख रुपये किंमतीचा पिकअप, 1 लाख रुपये किंमतीची इको कार, 4 लाख रुपये कंमतीची मारुती सुझुकी शो रुममधील स्विफ्ट कार असा एकूण 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त केली आहे. आरोपींनी कोंढवा, मंचर (Manchar Police Station), लोणीकंद (Lonikand Police Station), भोसरी (Bhosari Police Station), यवत पोलीस ठाण्याच्या (Yawat Police Station) हद्दीत गुन्हे केले आहेत.

आरोपी व त्याचे साथीदार हे सराईत गुन्हेगार आहेत.
त्यांच्यावर मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात (APMC Police Station Mumbai)
21 घरफोडी व इतर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka
करण्यात आली आहे. आरोपी जामीनावर बाहेर आले असून ते पुणे शहर
आणि परिसरात घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे करत होते. आरोपींनी चोरी केलेल्या ठिकाणावरुन 10 लाख रुपये किंमतीचा किराणा माल (Groceries) चोरल्याचे तपासात समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा (IPS Ranjan Sharma),
पोलीस उपायुक्त विक्रम देशमुख (DCP Vikram Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त शाहुराव साळवे (ACP Shahurao Salve)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे
(Senior PI Santosh Sonwane), पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (PI Sanjay Mogle),
पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे
(API Anil Suravse), पोलीस अंमलदार अमोल हिरवे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी,
सुहास मोरे, राहुल थोरात, विकास मरगळे, राहुल रासगे, राहुल वजारी यांच्या पथकाने केली

 

Web Title : Pune Crime News | Kondhwa police busted a gang of innkeepers from foreign states for house burglary,
vehicle theft, 7 crimes revealed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा