Pune Crime News | लष्कर पोलिस स्टेशन – पूर्ववैमनस्यातून तरुणांवर टोळक्यांनी हल्ला करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; चौघांना केली बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने दोघा भावावर कोयत्याने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. तसेच त्यांच्या दोन मित्रांवर वार करुन परिसरात दहशत निर्माण केली. (Pune Crime News)

 

याप्रकरणी अनिरुद्ध अनिल जगताप (वय २५, रा. न्यू मोदीखाना, कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अ‍ॅलेक्स गवळी (Alex Gavli) व त्याच्या दहा ते पंधरा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आझम कॅम्प गेटकडून पुना कॉलेज गेट नं. २ रोडवर रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाऊ पंकज जगताप, मित्र साहिल व कौस्तुभ हे बोलत थांबले होते. यावेळी पाच ते सहा गाड्यांवर आरोपी आले. अ‍ॅलेक्स गवळी याने पूर्व वैमनस्यातून फिर्यादी व त्यांच्या भावाला जिवे ठार मारण्याचा उद्देशाने त्यांना जिवंत सोडू नका असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. त्याच्या तावडीतून सुटका करुन फिर्यादी पळून जात असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन कोठेतरी पडून गहाळ झाली. फिर्यादीचा चुलत भाऊ पंकज जगताप याच्या उजव्या हाताला, दंडावर व डोक्यावर कोयत्याने वार करुन जबर जखमी केले. त्यांचा मित्र साहिल याच्या पाठीवर व उजव्या पायावर वार केले. कौस्तुभ याच्या पोटात वार करुन जखमी केले. आमच्या नादाला लागू नका, असे म्हणून हातातील हत्यारे फिरवत त्यांनी परिसरात दहशत पसरविली. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Lashkar Police Station – Gangs attacked youths and tried to kill
them due to past enmity; The four were severely beaten

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा