Pune Crime News | बनावट सह्या करुन फ्लॅट तारण ठेवून घेतले ५ कोटींचे कर्ज; वैशाली हॉटेलच्या मालकिणीची पतीविरोधात तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | बनावट सह्या करुन बनावट दस्त तयार करुन फ्लॅट तारण ठेवून त्याद्वारे ४ कोटी ९७ लाख ५ हजार रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी वैशाली हॉटेलच्या (Vaishali Hotel) मालकीणीने आपल्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी निकिता जगन्नाथ शेट्टी (वय ३४, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६७/२३) दिली आहे. त्यानुसार विश्वजीत विनायकराव जाधव Vishwajit Vinayakrao Jadhav (वय ४१), डी एस ए ( आर आर फायनान्सचे) रवी परदेशी आणि कोटक महिंद्रा बँक येरवडा शाखेचे मॅनेजर राजेश देवचंद्र चौधरी Rajesh Devchandra Chaudhary (वय ४२, रा. येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फर्ग्युसन रोडवरील निकिता हॉस्पिटलिटी एलएलपीच्या कार्यालयात ७ डिसेंबर २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता शेट्टी व विश्वजीत जाधव हे पतीपत्नी आहेत. प्रसिद्ध वैशाली हॉटेलच्या मालकीवरुन त्यांच्यात वाद निर्माण झाला असून त्यांनी एकमेकाविरुद्ध अनेक तक्रारी केल्या आहेत. आता फसवणुकीची तक्रार केली आहे.

फर्ग्युसन रोडवरील निकिता हॉस्पिटॅलिटी एलएलपी या कंपनीच्या कार्यालयात विश्वजीत जाधव याने बैठका घेऊन कट रचला.
फिर्यादी यांच्या खोट्या सह्या करुन या सह्या खर्‍या असल्याचे भासवून त्यांच्या आधारे बनावट दस्त तयार केले.
फिर्यादीच्या मालकीचा फ्लॅट त्यांच्या परवानगीशिवाय तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज घेऊन ४ कोटी ९७ लाख ५ हजार
रुपयांचा अपहार करुन फसवणूक (Fraud) केली. डेक्कन पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन अधिक तपासासाठी आर्थिक
गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

4 October Rashifal | सिंह, कन्या आणि तुळसह या २ राशीवाल्यांना चांगल्या लाभाचे संकेत, वाचा दैनिक भविष्य