Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – फोटो पतीला दाखविण्याची, मुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | फोटो पतीला दाखविण्याची तसेच मुलांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देवुन नराधमाने विवाहितेवर बलात्कार (Rape On Married Woman) केल्याची घटना दि. 29 डिसेंबर 2020 ते दि. 6 एप्रिल 2023 दरम्यान हांडेवाडी चौकातील (Handewadi Chowk Pune) गोकुळ लॉज, सासवड रोडवरील (Saswad Road) बोपदेव घाटातील (Bopdev Ghat) सह्ययाद्री लॉजमध्ये घडली. याप्रकरणी नराधमाविरूध्द लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये (Loni Kalbhor Police Station) बलात्काराचा (Rape In Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

सचिन विलास कदम Sachin Vilas Kadam (35, रा. एस.के. ग्रुप, अंबामाता चौक – Ambamata Chowk, सुखसागरनगर – Sukhsagar Nagar, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. यासंदर्भात कोंढवा (Kondhwa) परिसरात राहणार्‍या 30 वर्षीय विवाहीतेने लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी सचिन विलास कदम हा पिडीत विवाहीतेच्या ओळखीचा आहे. त्याने विवाहितेस जॉब शोधुन देईल (Lure Of Job), लग्न करेन असे आमिष दाखविले. (Pune Crime News)

आरोपी सचिन कदमने विवाहितेचे व त्याचे फोटो विवाहितेच्या पतीला दाखवुन पतीला व मुलांना जीवे मारीन
अशी धमकी दिली. आरोपी नराधमाने वारंवार विवाहितेच्या इच्छेविरूध्द जबरदस्तीने अनैसर्गिक पध्दतीने
शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवुन त्यांना मारहाण केली.
आरोपी नराधम हा वेळावेळी पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत होता तसेच फोटो दाखवितो असे म्हणत
होता म्हणुन विवाहितेने इतके दिवस पोलिसांकडे तक्रार केली नाही.
मात्र, आरोपी हा विवाहीतेला वेळावेळी वारंवार त्रास देत असल्याने अखेर विवाहीतेने लोणी काळभोर पोलिसांकडे
तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दाभाडे करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Loni Kalbhor Police Station – Married Woman Raped By Threatening To Show Photos To Husband And Kill Children

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | आरक्षणाचा मार्ग बंद झालेला नाही, गैरसमज करुन घेऊ नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (व्हिडिओ)

Maratha Reservation | ‘मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व दौरे रद्द करुन बोलावली मंत्रिमडंळाची बैठक’

Ajit Pawar | कोण संजय राऊत? उगाच अंगाला का लागावं? अजित पवारांचा टोला

Pune Crime news | पुणे क्राईम न्युज : शिवाजीनगर पोलीस स्टेशन – जंबो कोविड सेंटर – पीएमआरडीए | संजय राऊतचे यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांच्यासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण