Pune Crime News | लोणी काळभोर : पत्नीनं अंगावर पेट्रोल ओतून घेतलं, पतीनं चक्क तिला पेटवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | दारु पिऊन घरी येऊन मारहाण (Beating) करणार्‍या पतीला भिती दाखविण्यासाठी तिने अंगावर थोडेसे पेट्रोल ओतून घेऊन मी मरते आता, असे म्हणाली, त्यावर पतीने काडी ओढून तिला पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत अमृता अक्षय कुंजीर (वय २३, रा. वळती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५९२/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय मारुती कुंजीर (Akshay Maruti Kunjir) आणि आशा मारुती कुंजीर (Asha Maruti Kunjir) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वळती येथील फिर्यादीच्या घरी १२ सप्टेबर रोजी दुपारी २ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि अक्षय कुंजीर यांचा २०२० मध्ये प्रेमविवाह (Love Marriage) झाला आहे. सध्या त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्यांना एक मुलगा आहे.
अक्षय हा वारंवार दारु पिऊन येऊन मारहाण करतो. १२ सप्टेबरला तो असाच दारु पिऊन आला व घरातील सामानाची
तोडफोड करीत होता. त्यावेळी त्याने तु घरातून निघून जा, तु घरात रहायचे नाही, असे म्हणाला.
त्यावर फिर्यादी यांनी मी मरुन जाते, असे म्हणाल्या. शेतीपंपासाठी आणलेल्या पेट्रोलमधील थोडे पेट्रोल त्याला
भिती दाखविण्यासाठी अंगावर ओतले. त्यावेळी त्याने काडे पेटी आणून अंगावर टाकली.
त्यानंतर त्यानेच फिर्यादीच्या अंगावर पाणी ओतून विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत फिर्यादी यांची छाती,
गळा व तोंडास गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल केले.
फिर्यादी यांची सासु आशा कुंजीर यांनी तू जर सांगितले की तुला तुझ्या नवर्‍याने पेटविले तर दवाखान्यात उपचार
करणार नाहीत, अशी भिती दाखविली. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला लोणी काळभोर पोलिसांना चुलीवर स्वयंपाक
करताना अचानक पेट्रोल ओतल्याने भडका होऊन भाजले असे भितीपोटी सांगितले होते. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खोसे (Assistant Police Inspector Khose) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Health Tips | इम्युनिटी वाढवण्यासाठी नियमित काढा पिता का? शरीराच्या या अवयवांचे होते नुकसान