Health Tips | इम्युनिटी वाढवण्यासाठी नियमित काढा पिता का? शरीराच्या या अवयवांचे होते नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Tips | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनने लोकांची चिंता वाढली आहे. यापासून बचाव करण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केले असून लोकांना गरज असेल तेव्हाच बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, आता काही ठिकाणी नियमांमध्ये शिथिलताही देण्यात आली आहे. ज्यांची इम्युनिटी (Immunity) कमकुवत मानली जाते अशा लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका जास्त असतो. (Health Tips)

 

लोक इम्युनिटी मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत, ज्यामध्ये काढ्याचा समावेश आहे. लवंग, हळद, आले, दालचिनी, जायफळ आणि इतर गोष्टी मिसळून काढा तयार केला जातो. तज्ज्ञांच्या मते, हे कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रभावी आहे, परंतु काढ्याचे दुष्परिणाम देखील आहेत.

 

अनेक लोकांनी नियमित पेय म्हणून त्यास दिनक्रमाचा भाग बनवले आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानी करू शकतो आणि हा नियम काढ्याच्या बाबतीत देखील लागू होतो. हा काढा रोज प्यायल्याने आपल्या शरीराच्या अनेक भागांवर वाईट परिणाम होतो. याबाबत जाणून घेवूयात… (Health Tips)

 

1. किडनी (Kidney)
इम्युनिटी वाढवण्यासाठी लोक 2 वर्षांपासून नियमितपणे काढ्याचे सेवन करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, यामुळे शरीरातील सीरम क्रिएटिनिनची पातळी वाढते आणि किडनी खराब होण्याची शक्यता असते. काढ्याचा प्रभाव गरम असतो आणि यामुळे हळूहळू लोकांना छातीत जळजळ आणि पोटाचा त्रास होऊ लागतो.

 

हे आजार वेळेत बरे झाले नाहीत तर त्याचा वाईट परिणाम किडनीवर होतो. इतकंच नव्हे तर लघवीमध्ये इन्फेक्शनचं प्रमाणही काढ्यामुळे वाढते आणि त्यामुळे किडनीच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

2. लिव्हर (Liver)
तज्ज्ञांच्या मते, काढ्याचे जास्त सेवन केल्याने लिव्हरच्या आरोग्यालाही हानी पोहोचते.
त्यामुळे लिव्हरवर अतिरिक्त भार पडतो आणि त्याची काम करण्याची क्षमताही कमकुवत होऊ लागते.
असे म्हटले जाते की जास्त प्रमाणात काढा प्यायल्याने लिव्हरला टॉक्सिसिटीची समस्या होऊ शकते.

 

त्यामुळे जर तुम्ही देखील नियमित पेय म्हणून काढ्याचे सेवन करत असाल तर आजपासून ती सवय सोडा.
काढ्याचे सेवन केल्याने इम्युनिटी वाढू शकते, परंतु तो मर्यादित प्रमाणात प्या.

 

3. मूळव्याध (Hemorrhoids)
हा काढा मुळात खूप उष्ण असतो आणि ज्यांना मूळव्याधची समस्या आहे त्यांनीही मर्यादित प्रमाणात सेवन करावे.
यामुळे, शौचाला जळजळ आणि खाज वाढते.

 

तज्ज्ञांनुसार, यामुळे जळजळ किंवा इतर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
ज्या लोकांना मूळव्याधची समस्या खूप दिवसांपासून आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काढ्याचे सेवन करू नये.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Tips | for immunity if you made kadha as your regular drink it can harms some body parts know

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Breastfeeding Nutrition Food | बाळाला देत असाल स्तनपान तर आहारात करा ‘या’ महत्वाच्या फूड्सचा समावेश

Crack Heels Remedies | घरीच बर्‍या करू शकता भेगा पडलेल्या टाचा, ‘या’ आहेत पद्धती

Diabetes | डायबिटीजचा धोका ‘या’ 6 लोकांना जास्त, तुमचा सुद्धा यामध्ये समावेश नाही ना?