Pune Crime News | खडकवासला धरणात उडी मारुन तरुणाची आत्महत्या, घरगुती वादातून उचललं टोकाचं पाऊल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | घरगुती वादातून एका तरुणाने खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली. गुरुवारी (दि.5) सकाळी पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. (Pune Crime News)

स्वप्नील रामभाऊ कणसे (वय-34 मुळ रा. लोखंडी सावरगाव ता. अंबेजोगाई जि. बीड, सध्या रा. सिद्धी हाईट्स, शिवणे, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. स्वप्नील पेंटींगचे काम करत होता. त्याला दारु पिण्याचे व्यसन असल्याने त्याचे घरातील इतर सदस्यांसोबत वारंवार लहान मोठे वाद होत होते. बुधवारी वाद झाल्यानंतर तो घरातून निघून गेला होता. (Pune Crime News)

स्वप्नील घरी परत न आल्याने त्याच्या आईने उत्तमनगर पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास खडकवासला धरणाच्या अकरा नंबर मोरीजवळ पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी याबाबत हवेली पोलीस ठाण्यात माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस हवालदार निलेश राणे, विलास प्रधान, दिनेश कोळेकर, दिपक गायकवाड, महेंद्र चौधरी, प्रविण ताकवणे हे
तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विभागीय अग्निशमन अधिकारी सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
पीएमआरडीए च्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

API Sarika Jagtap | किशोरवयीन मुलींनी व्यक्त व्हावे – सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप

Pune News | मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या साऊंड सिस्टिमवर निर्बंध आणावेत यासाठी 4-5 वर्षांपासून पोलिसांकडे पाठपुरावा करतोय