Pune Crime News | वारज्यात वाहनांची तोडफोड करणार्‍या पप्पुल्या वाघमारेवर पुर्वीच्या गुन्ह्यात ‘मोक्का’, तोडफोड करणार्‍या 6 जणांच्या मुसक्या आवळल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वारजे माळवाडी पोलिस स्टेशनमध्ये (Warje Malwadi Police Station) दाखल असलेल्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील 5 आरोपींवर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का अंतर्गत MCOCA (Mokka Action) कारवाई केली आहे. दरम्यान, त्याच गुन्ह्यात आरोपी असलेला पप्पुल्या उर्फ दिग्वीजय वाघमारे (19, रा. दत्तनगर, सुभाष बराटे चाळ, रामनगर, वारजे माळवाडी) याने वारजे माळवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केली होती. (Pune Crime News)

 

पप्पुल्या उर्फ दिग्वीजय तुकाराम वाघमारे Pappulya alias Digvijay Tukaram Waghmare (19, रा. वारजे माळवाडी), राहुल विठ्ठल वांजळे Rahul Vitthal Wanjale (24, रा. न्यु अहिरेगाव, पुणे), मारोती उर्फ मारत्या पांडुरंग टोकलवाड Maroti alias Maratya Pandurang Tokalwad (19, रा. वारजे), हर्षद उर्फ बाब्या संतोष वांजवडे Harshad Alias Babya Santosh Vanjwade (19, रा. वारजे गावठाण), नंद्या (पाहिजे असलेला आरोपी) आणि एक अल्पवयीन युवक यांच्याविरूध्द मोक्का कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

दरम्यान, पप्पुल्या वाघमारे आणि त्याच्या साथीदारांनी सोमवारी मध्यरात्री कर्वेनगर (Karve Nagar) परिसरातील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम समोरील गल्ली नं-7 मध्ये चारचाकी, दुचाकी वाहनांच्या काचांची तोडफोड केली होती. त्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात अनुप अनंता वाळुंजकर (28, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये पोलिसांनी पप्पुल्या उर्फ दिग्वीजय तुकाराम वाघमारे याच्यासह 6 जणांना ताब्यात घेतले आहे.

 

पप्पुल्या वाघमारे याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून दहशत निर्माण केली आहे. टोळीच्या वर्चस्वासाठी व दशहत कायम ठेवण्यासाठी त्यांनी सातत्याने गुन्हे केलेले आहेत. मागील काही वर्षामध्ये एकापेक्षा अधिक गुन्हे त्यांनी केले आहेत. त्याबाबत न्यायालयामध्ये दोषारोपपत्रे देखील दाखल करण्यात आलेली आहे.

पप्पुल्या वाघमारे टोळीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी वारजे माळवाडी पोलिसांनी वरिष्ठांमार्फत
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.
त्यास मंजुरी देण्यात आली असून पप्पुल्या वाघमारे टोळीविरूध्द मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दाखल मोक्क्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele) करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | MCOCA On Pappulya Waghmare In Previous Attempt To Murder Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा