Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग, धायरी येथील घटना; तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग (Molestation Case) केल्याप्रकरणी धायरी येथील एका तरुणाच्या विरोधात सिंहगड रोड पोलिसात (Pune Police) पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते बुधवार (दि.18) दरम्यान धायरी गावात घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत टाकवे बु. येथे राहणाऱ्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. तर कृष्णा भिमराव साळुंके Krishna Bhimrao Salunke (वय-23 रा. धायरेश्वर मंदिराच्या जवळ, धायरी) याच्यावर आयपीसी 354, 354(ड), 323, 506, सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या वर्षभरापासून फिर्यादी यांचा पाठलाग करत आहे.
त्याने लग्न करायचे असल्याचे सांगून मुलीसोबत गैरवर्तन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
पीडित मुलीने लग्न करण्यास नकार दिला असता आरोपी कृष्णा साळुंके याने हाताने मारहाण केली.
तसेच फिर्यादी यांच्या मैत्रिणीला फोन करुन शिवीगाळ करुन दमदाटी केल्याचे फिर्य़ादीत नमुद केले आहे.
पीडित मुलीने तक्रार देताच पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिव (API Chandanashiv) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलीस भरती करण्याचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार, वानवडी परिसरातील घटना, अ‍ॅकॅडमी चालकावर FIR