Pune Crime News | कुख्यात मटया कुचेकरसह टोळीतील 8 जणांवर मोक्का, एका महिलेचा समावेश; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची आतापर्यंची 8 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | नाना पेठेतील राजेवाडी (Rajewadi, Nana Peth) परिसरात जुन्या भांडणाच्या वादावरून युवकाचा कोयत्याने, विटांनी मारहाण करून खून (Murder In Pune) करून दहशत निर्माण करणार्‍या कुख्यात सुशांत उर्फ मटया शशिकांत कुचेकर (Sushant – Matya Kuchekar) याच्यासह त्यांच्या टोळीतील एकुण 8 जणांविरूध्द मोक्का MCOCA (Mokka Action) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 8 टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

टोळीचा म्होरक्या सुशांत उर्फ मटया शशिकांत कुचेकर (28, रा. 843, नाना पेठ, राजेवाडी), आदित्य राजु केंजळे (18, रा. खडक चौक, धायरी), स्वरूप संतोष गायकवाड (18, रा. 257, गुरूवार पेठ), राजन अरूण काऊंटर (23, रा. 843, राजेवाडी, नाना पेठ), तेजय अशोक जावळे (32, रा. 857, नाना पेठ), अतिष अनिल फाळके (27, रा. 838, नाना पेठ) यांच्यासह सह एक महिला आणि एका अल्पवयीन मुलावर सदरील मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

 

दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी आरोपींनी आपआपसात संगणमत करून नाना पेठेतील राजेवाडी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून युवकाचा कोयत्याने सपासप वार करून आणि विटांनी मारहाण करून खून केला होता. परिसरात दहशत निर्माण केली होती. टोळीचा म्होरक्या मटया कुचेकर आणि त्याचे इतर साथीदार हे अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने जबरी चोरी, खून, गुन्हा करण्यासाठी कट रचणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीररित्या जमाव जमविणे यासारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होते. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्यानंतर देखील त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर गुन्हे केले आहेत. (Pune Crime News)

आरोपींच वर्तनात सुधारणा होत नसल्याने समर्थ पोलिस ठाण्याचे (Samarth Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे (Sr PI Ramesh Sathe) यांनी पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल (IPS Sandeep Singh Gill) यांच्या मार्फत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी म्हणून अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रकरणाची छाननी करून कुचेकर टोळीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदरील गुन्हयाचा पुढील तपास फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) करत आहेत.

 

सदरील कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Retesh Kumaarr),
सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर आयुक्त राजेंद्र डहाळे (IPS Rajendra Dahale),
उपायुक्त संदीप सिंह गिल, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे (PI Pramod Waghmare), सहाय्यक निरीक्षक प्रसाद लोणारे (API Prasad Lonare),
सहाय्यक उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले, पोलिस अंमलदार प्रमोद वायकर, प्रमोद जगताप, संतोष थोरात,
किरण शितोळे, हेमंत पेरणे, रहिम शेख आणि महिला पोलिस अंमलदार निलम कर्पे यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Mokka on 8 gang members including the notorious Mataya Kuchekar, including a woman; Police Commissioner Retesh Kumaarr’s 8th action so far

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kasba Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीवरुन आघाडीत बिघाडी?, शिवसेना निवडणूक लढवणार, काँग्रेस काय घेणार निर्णय?

Amol Mitkari | संत तुकाराम महाराजांवर केलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले…

Pune Crime News | सहा महिन्यापूर्वीच्या वादातून तरुणाला मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; येरवडा पोलीस ठाण्यात FIR