Pune Crime News | सहा महिन्यापूर्वीच्या वादातून तरुणाला मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; येरवडा पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Crime News | फुटबॉल खेळण्यावरुन सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून तरुणाला अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने कोयता व लाकडी बांबुने मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) चौघा अल्पवयीन मुलांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी अब्दुल्ला आमीरउल्ला खान (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८२/२३) दिली आहे. हा प्रकार गजराज चौकात २८ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. सुमारे सहा महिन्यांपूर्वी फुटबॉल खेळण्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग मनात धरुन फिर्यादी हे त्यांच्या मित्रांबरोर मोटारसायकलवरुन जात होते. तेव्हा लक्ष्मीनगरमधील गजराज चौकात चौघा अल्पवयीन मुलांनी त्यांना अडविले. त्यांच्यावर कोयत्याने वार केला. लाकडी बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यांचा मित्र महेश मिश्रा यास लाकडी बांबुने मारहाण करुन परिसरात दहशत निर्माण केली. तेथील दोन रिक्षांच्या काचा फोडून त्यांचे नुकसान केले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | An attempt to beat a young man to death over
an argument six months ago; FIR in Yerwada Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा