Pune Crime News | मायलेकीचे मृतदेह धक्कादायक अवस्थेत आढळले, नातेवाईकांनी पतीला पोलिसांसमोर चोपले; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

इंदापूर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | इंदापूर तालुक्यातील हगारेवाडी येथे मायलेकी मृतावस्थेत आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अश्विनी सागर म्हस्के (वय-28) व सानवी सागर म्हस्के (वय-4) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.20) दुपारी पावणे एकच्या सुमारास राहत्या घरात उघडकीस आली आहे. (Pune Crime News )

अश्विनी आणि सानवी यांची हत्या केली आहे की त्यांनी आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून महिलेचा पती सागर म्हस्के याला ताब्यात घेतले आहे. आरोपीला पोलीस घेऊन जात असताना मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी पोलिसांसमोर मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्री नातेवाईकांनी घेतला आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, तेजश्री शेखर म्हस्के आणि मृत अश्विनी म्हस्के या सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा आहेत. तेजश्री दुपारी शेतातून घरी आल्या. त्यावेळी घराची खिडकी उघडी दिसली. तेजश्री यांनी खिडकीतून पाहिले असता अश्विनी आणि सानवी यांचा मृतदेह घरातील पत्र्यच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकल्याचे निदर्शनास आले.

या घटनेची माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक मिलींद मिठापल्ली, विजय टिळकेकर,
विनोद पवार आणि प्रमोद तापसे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी इंदापूर
येथे पाठवला. याप्रकरणी मृत अश्विनीचे भाऊ तात्या आण्णा भोंग (रा. निमगाव केतकी, इंदापूर) यांच्या फिर्यादीवरुन
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याचा शोध पोलीस घेत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | पोलीस चौकीत लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Punit Balan Group Felicitates Rituja Bhosle | पुनीत बालन ग्रुपच्या पाठीब्यामुळेच सुवर्णपदकाला गवसणी; ऋतुजा भोसले हिचे उद्गार (Video)