Pune Crime News | जादुटोणा सारखे अघोरीकृत्य करून 4 कोटी देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची 1 कोटीची फसवणूक ! बिल्डर नादीर नईम आबादी, मौलाना शोएब अत्तार, मजीद अत्तार, खालिद अत्तार, इरम शोएब अत्तार, सीमा उर्फ रोहिया नादीर नईमाबादी यांच्यावर एम.पी.आय.डी

Samarth Police Station

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लॉकडाऊन काळात बांधकाम व्यवसायात (Construction Business) पैसे गुंतवण्यास (Investment In Import Export) कोणी तयार नसल्याने एका बांधकाम व्यवसायिकाने एकाला इम्पोर्ट एक्सपोर्ट (Import Export Business) व्यवसायातून जास्त परतावा (4 कोटी) देण्याचे आमिष दाखवून तब्बल 91 लाखांची फसवणूक (Fraud Case) केली. तसेच जादुटोण्यासारखे (Witchcraft) अघोरी कृत्य केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) सहा जणाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) ऑगस्ट 2020 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत रास्तापेठ येथे घडला. या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमन 1999 चे कलम 3 चा अंतर्भाव करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतिफ (वय-45 रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमा आबादी Nadir Abdul Hussain Hasan Ali Naima Abadi (रा. सिनागग ईस्ट्रीट, पुणे कॅम्प), सीमा उर्फ रोहिया नादीर नईमा आबादी Seema alias Rohia Nadir Naima Abadi (वय -35 रा. पुणे कॅम्प), मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार Maulana Shoaib Mainuddin Attar (रा. जामा मस्जिदचे शेजारी, बोपोडी), माजीद उस्मान आत्तार Majid Usman Attar (रा. बोपोडी), खालीद मैनुद्दीन आत्तार Khalid Mainuddin Nowar (रा. बोपोडी), इरम शोऐब आत्तार Iram Shoaib Attar (रा. बोपोडी) यांच्यावर आयपीसी 328, 420, 406, 120 (B), 34 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमन 1999 चे कलम 3 चा अंतर्भाव (MPID Act) करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे यांनी न्यायालयात दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पादत्राणाचा होलसेल व रिटेल व्यवसाय आहे. तर आरोपी मौलाना शोएब व नादीर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. लॉकडाऊन काळात बांधकाम व्यावसायामध्ये मंदी असल्यामुळे नादीर व मौलाना शोएब यांना पैशांची गरज होती. त्या काळात कोणीही बांधकाम व्यवसायामध्ये पैश्यांची गुंतवणुक करत नव्हते. त्यामुळे आरोपींनी संगनमत करुन त्यांचा कोणताही इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय नसताना या व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले.

फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून वेळोवेळी 90 लाख 75 हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केले. परतावा मिळत नसल्याने फिर्यादी यांनी आरोपींकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी आरोपींनी बनावट कागदपत्र दाखवून साऊदी मक्का येथे मोठा व्यवसाय करण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले. तसेच मौलाना शोऐब याने जादुटोण्यासारखे अघोरी कृत्य करुन फिर्यादी यांना गुंगीकारक पाणी पिण्यास दिले. तसेच ताबीज बनवून देण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून पैसे घेतले. आरोपींनी फिर्यादी यांच्यासह इतर अनेकांची फसवणूक केली (Cheating Case). फिर्यादी यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे (Economic Offence Wing Pune (EOW Pune) तक्रार अर्ज केला आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना साक्षीदार जावेद रमजान तांबोळी (वय-49 रा. मार्केट यार्ड, पुणे)
यांना देखील आरोपींनी फिर्य़ादी यांच्याप्रमाणे व्यवसायामध्ये जादा परतावा मिळत
असल्याचे आमिष दाखून पैसे गुतविण्यास भाग पडले. साक्षीदार यांनी पैसे गुंतविल्यानंतर त्यांना काही रक्कम
परतावा म्हणून दिली. मात्र बाकी रक्कम देण्यास टाळाटाळ करुन साक्षीदार यांची फसवणूक केल्याचे
तपासात निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमन 1999 चे कलम 3 चा अंदर्भाव करण्यात आला असल्याची माहिती समर्थ पोलिसांनी एम.पीआय.डी न्यायालयात दिली.

आरोपींच्या जामिन अर्जास विरोध होणेकामी फिर्यादी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता
औरंगाबादकर तसेच अ‍ॅड. महेश झंवर, अ‍ॅड अमेय सीरसीकर (उच्च न्यायालय), अ‍ॅड श्रीकृष्ण घुगे,
अ‍ॅड प्रसाद रेणुसे, अ‍ॅड प्रतीक वारे यांनी पाहिले. या गुन्ह्याचा तपास अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील,
पोलीस उपायुक्त संदिप सिंग गिल यांच्या आदेशावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे,
तपास अधिकारी प्रमोद वाघमारे, रायटर निलम कर्पे यांनी गन्ह्याचा तपासकरुन गुन्हयात
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्ती संस्थांमधील) हितसंबंधीचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ०३ या
कलमाचा अंतर्भाव केला आहे. दरम्यान, यामधील काही आरोपी फरार झाले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागणाऱ्या पुण्यातील दोन पत्रकारांवर FIR, प्रचंड खळबळ

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर