Pune Crime News | व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागणाऱ्या पुण्यातील दोन पत्रकारांवर FIR, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | व्यावसायिकाला व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या (Extortion Case) पुण्यातील दोन पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Ransom Case On Two Journalist In Pune). हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते 13 जुलै 2023 दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत विलास गुलाबराव देशमुख (वय-64 रा. वडगावशेरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उदय पोवार Uday Powar (वय-40 रा. कर्मभुमीनगर, लोहगाव, पुणे – Lohegaon Pune), शब्बीर शेख Shabbir Shaikh (रा. आळंदी-धानोरी रोड, बुद्ध विहार जवळ, विश्रांतवाडी -Vishrantwadi) यांच्यावर आयपीसी 383, 499, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उदय पोवार हा पुण्यातील एका दैनिकात पत्रकार म्हणून काम करतो. तर शब्बीर शेख हा देखील पत्रकार आहे. आरोपींनी वडगावशेरी येथील पंपींग स्टेशन येथे फिर्यादी यांच्याकडे खंडणीची मागणी केली. त्यांनी फिर्यादी यांच्याकडून आतापर्य़ंत 25 हजार रुपये रोख आणि 5 हजार रुपये युपीआय द्वारे असे एकूण 30 हजार रुपये घेतले आहेत.आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे पुन्हा खंडणीची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर शब्बीर शेख याने फिर्यादी यांचा चालक राजाराम मधोळकर यांच्या फोनवर फोन करुन फिर्यादी यांना व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देली.

Advt.

आरोपींनी खोटी बातमी दाखवली. तसेच वृत्तपत्रामध्ये 14 जुलै रोजी वृत्त देऊन फिर्यादी यांची खोटी बदनामी केली.
याबाबत फिर्यादी यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टात धाव घेतली.
कोर्टाच्या आदेशानुसार सीआरपीसी कलम 156(3) नुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड (PSI Swapnali Gaikwad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई!
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 42 वी स्थानबध्दतेची कारवाई