Pune Crime News | मुंढवा पोलिसांनी गहाळ झालेले 17 मोबाईल नागरिकांना केले सुपूर्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुंढवा पोलीस ठाण्याच्या (Mundhwa Police Station) हद्दीत प्रवासादरम्यान विविध ठिकाणावरुन मोबाईल हॅन्डसेट गहाळ झाल्याबाबत ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मुंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांनी गहाळ (Mobile Missing) झालेले 17 मोबाईल मिळवून ते ज्यांचे आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. (Pune Crime News)

मुंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रवासादरम्यान व विविध ठिकाणाहून मोबाईल गहाळ झाल्याबाबत मुंढवा पोलिस ठाण्यात ऑनलाईन तक्रारी (Online Complaints) प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा तपास पथकाकडून शोध घेतला जात होता. तपास पथकाचे पोलीस हवालदार महेश पाठक (Police Constable Mahesh Pathak) यांनी हे मोबाईल CEIR प्रणालीच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करुन विविध कंपन्यांचे 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे 17 मोबाईल हॅन्डसेटचा शोध घेतला. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची सर्व माहिती संकलीत करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Senior PI Vishnu Tamhane) यांनी मुळ मालकाच्या स्वाधीन केले. (Pune Crime News)

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख (ACP Ashwini Rakh), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे,
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप काकडे (PI Pradeep Kakade) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश पाठक
यांनी केली.

Netflix Cracks Down on Account Sharing: One Household Policy in India and Select Markets

Khalapur Irshalwadi Landslide | ‘…मग हे कसलं प्रशासन?’ इर्शाळवाडी दुर्घटनेवर राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया