Pune Crime News | बेधूंद वातावरणात लोणावळ्यातील व्हिस्प्रींग वुड हॉटेलमध्ये सुरु होता अश्लिल डान्स ! पुणे ग्रामीण पोलिसांनी बंद केली छमछम; 53 जणांवर कारवाई, 9 महिलांचा समावेश

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोणावळा येथील व्हिस्प्रींग वुड हॉटेलमध्ये (Whispering Wood Hotel) साऊंड सिस्टीमच्या मोठ्या आवाजात अश्लील गाण्यावर विवस्त्र चाळे करुन अश्लील नृत्य (Obscene Dance) करणाऱ्यांवर लोणावळा पोलिसांनी (Lonavala Police) कारवाई केली आहे. लोणावळा उपविभागाचे (Lonavala Sub Division) पोलीस उप अधीक्षक सत्यसाई कार्तिक (DySP Satyasai Karthik) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई (Pune Crime News) करण्यात आली. या कारवाईत 53 जणांना ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये 44 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. (Lonavala Crime News)

लोणावळा उपविभागाचे पोलीस उप अधीक्षक सत्यसाई कार्तिक (DySP Satyasai Karthik) यांना माहिती मिळाली की, व्हिस्प्रींग वुड हॉटेल याठिकाणी काही व्यक्ती व महिला अश्लील गाण्यावर नृत्य करत आहेत. तसेच साऊंड सिस्टीम मोठ्याने वाजवून अश्लिल चाळे करुन गाण्यावर नृत्य करीत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वत: सत्यसाई कार्तिक त्यांचे पथक व लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील (Lonavala City Police Station पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकला. (Pune Crime News)

त्यावेळी त्याठिकाणी 44 पुरुष व 9 महिला असे एकूण 53 जण गाण्यावर अश्लील नृत्य करुन विविस्त्र चाळे
करुन नियम व तरतुदीचे उल्लंघन करताना आढळून आले. पोलिसांनी सर्व पुरुष व महिलांना ताब्यात घेऊन साऊंड सिस्टम जप्त केले आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संदिप अजिनाथ बोराडे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 53 जणांवर आयपीसी 294, 34 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे.

Web Title :-   Pune Crime News | Obscene dance started in Whispering Wood Hotel in Lonavala in a smokeless atmosphere! Pune Rural Police closed Chhamchham; Action against 53 people, including 9 women

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aruna Irani | रेखा यांच्याबद्दल अरुणा इराणींचा धक्कादायक खुलासा; तब्बल 42 वर्षांनंतर केला खुलासा

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll election | विधानसभा पोटनिवडणूक : चिंचवड मतदारसंघासाठी 510 तर कसबा पेठ मतदारसंघासाठी 270 मतदान केंद्रे