Pune : दरोडयाच्या तयारीत असलेल्यांना हडपसर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला हडपसर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ६ कोयते, कटावणी, मिरची पावडर, दुचाकी मिळून ८१ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

फैय्याज गफ्फार बागवान (वय २४), फैय्याज इस्माईल बागवान (वय २४), सिद्धार्थ उर्फ सिद्धु हनुमंत कट्टिमनी (वय १९), इम्रान मुस्ताक पठाण (वय २१) , नागेश रामा कांबळे (वय २१), आफताब हकिम बागवान ( सर्व रा. हडपसर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गोविंद चिवळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिस पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पॅराग्लायडिंग मैदानालगत संशयास्पद काहीजण थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ६ कोयते, कटावणी, मोबाईल, मिरची पावडर, दुचाकी असा ऐवज मिळून आला. परिसरातील एटीएम मशीनवर दरोडा टाकण्याच्या तयारीत ते असल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास सहायक निरीक्षक रत्नदीप गायकवाड करीत आहेत.