Pune Crime News | स्वारगेट परिसरात वेटरने 3 वाहनांच्या फोडल्या काचा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  Pune Crime News एका प्रसिद्ध हॉटेलात वेटर असणाऱ्या तरुणाने स्वारगेट (Swargate) परिसरात नशेत भल्या सकाळी चांगलाच राडा घालत 3 वाहनांच्या काचा फोडून धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. pune crime news of swargate area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याप्रकरणी मनोज लक्ष्मण बीष्ट (वय 34, वडगाव ब्रिज) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत हेमंत सूर्यवंशी (वय 38) यांनी स्वारगेट पोलीस (Swargate Police) ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीष्ट हा सिंहगड रोड येथील एका प्रसिद्ध हॉटेलात वेटर आहे.
रविवारी सकाळी फिर्यादी हे त्यांच्या निलायम ब्रिज (Nilayam Bridge) येथून जात होते.
त्यावेळी साजन हॉटेलसमोर (Sajan Hotel) रस्त्यावरच उभा राहून वाहने अडविण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी फिर्यादी हे त्यांची कार घेऊन येत असताना त्याने कार अडवली.
फिर्यादी थांबले असता त्यांच्या कारची काच फोडली.
तर वायफर तोडून ते हातात घेऊन रस्त्यावरच धिंगाणा घालण्यास सुरुवात केली आहे.
त्यानंतर आणखी एक कार अडवत त्याने त्याची काच फोडली.
त्यानंतर एक पीएमपी बस आल्यानंतर त्याला देखील आडवे जात बस थांबवण्यास भाग पाडले आणि बसची काच फोडली. रस्त्यावरच चालेला धिंगाणा पाहून नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.
यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.
यानंतर त्याला पकडले. त्याने कसली तरी नशा केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title : pune crime news of swargate area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MP Girish Bapat | ‘राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील एक छोटासा पक्ष’