Pune Crime News | जुने कपडे घेण्याच्या बहाण्याने घरात चोरी, शिवाजीनगर पोलिसांकडून परराज्यातील दोन महिलांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जुने कपडे घेण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करुन चोरी (Burglary) करणाऱ्या दोन परप्रांतिय महिलांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी (Pune Police) ही कारवाई सासवड येथे केली आहे. ही घटना (Pune Crime News) मॉडेल कॉलनी (Model Colony) भागात घडली होती. आरोपी महिलांकडून चोरी केलेला मोबाईल आणि रोख 25 हजार रुपये जप्त केले आहेत.

याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. 25 जून रोजी सायंकाळी दोन महिला जुने कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या घरात आल्या. त्यांनी भूक लागली असून जेवण मिळेल का अशी विचारणा फिर्यादी यांच्याकडे केली. फिर्यादी यांनी त्या दोन महिलांना जेवण दिले. त्यानंतर त्या दोघी निघून गेल्या. दरम्यान त्यांनी घरातील वस्तूंची रेकी केली. फिर्यादी बाहेर गेल्यानंतर आरोपी महिलांनी घरात प्रवेश करुन घरातील 60 हजार रुपये रोख, मोबाईल, असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. (Pune Crime News)

या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण करुन चोरी करणाऱ्या महिलांचा शोध घेतला असता त्या सासवड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना
मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सासवड येथून मिराबेन सुनिल सोंळकी (वय-35) आणि गिता विजय कांगिया
(वय-45 दोघी रा. खंडोबानगर, सासवड, मुळ रा. साबरमती, गुजरात-Gujarat) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मोबाईल आणि 25 हजार रुपये जप्त केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निसार शेख (PSI Nisar Sheikh) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त वसंत कुंवर
(ACP Vasant Kunwar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Sr PI Arvind Mane),
पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड (PI Vikram Goud), सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक (API Bajirao Naik),
पोलीस उपनिरीक्षक निसार शेख (PSI Nisar Shaikh, पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी,
महिला पोलीस अंमलदार रुचिका जमदाडे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News | On the pretext of buying old clothes, two women from abroad were arrested by the Shivajinagar police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मुंढवा पोलिसांकडून उच्चभ्रु सोसायटीमध्ये भरदिवसा घरफोडी करणार्‍याला अटक, 5 लाखाचा ऐवज जप्त

Maharashtra NCP Political Crisis | अजित पवारांनी 24 तासात दोन वेळा घेतली शरद पवारांची भेट, प्रफुल्ल पटेलांनी भेटीचं खरं कारण सांगितलं; म्हणाले…

Maharashtra Political Crisis | अजितदादा सर्व आमदारांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला, दादांनी आज पुन्हा थोरल्या पवारांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण

Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! चोरट्यांनी वेअर हाऊसमधून लंपास केले तब्बल 65 लाखांचे 105 आय फोन