Maharashtra NCP Political Crisis | अजित पवारांनी 24 तासात दोन वेळा घेतली शरद पवारांची भेट, प्रफुल्ल पटेलांनी भेटीचं खरं कारण सांगितलं; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra NCP Political Crisis | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करुन सत्तेत सामील झालेल्या अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची आज पुन्हा भेट घेतली. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल (Praful Patel), सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवारांची वायबी चव्हाण सेंटरमध्ये (YB Chavan Centre) भेट घेतली. दीड तास चालेल्या या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. तसेच पुन्हा एकदा पक्ष एकसंघ (Maharashtra NCP Political Crisis) राहावा यासाठी योग्य विचार करावा अशी विनंती केल्याचे पटेल यांनी सांगितले.

आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) सुरुवात झाली आहे. आज सभागृहाचं पहिल्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठीकनंतर सर्व आमदार (Ajit Pawar Group MLA) शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. अजित पवार यांनी काल शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा भेट घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं काय चाललंय? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (Maharashtra NCP Political Crisis)

म्हणून आम्ही इथे आलो – पटेल

शरद पवार यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, आज अजित पवार व विधिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वायबी चव्हण सेंटर येथे आले होते. आम्ही सगळे इथे आलो. काल अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष (Assembly Vice President) व ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी इथे आलो होतो. काल रविवार असल्याने आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधिमंडळाचं अधिवेशन सुरु झाल्यामुळे बरेच आमदार इथे आले आहेत. त्यामुळे या आमदारांना शरद पवारांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही इथे आलो, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

त्यांच्या मनात काय आहे हे आम्ही कसं सांगू शकतो?

पटेल पुढे म्हणाले, आम्ही माहिती काढली की शरद पवार चव्हाण सेंटरला दुपारी येणार आहेत. म्हणून आम्ही याठिकाणी आलो.
सर्व आमदारांनी शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेतला. काल मी म्हणालो तशीच पक्ष एकसंघ राहण्यासंदर्भात आम्ही साहेबांना विनंती केली. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. आता त्यांच्या मनात काय आहे हे आम्ही कसं सांगू शकतो? असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Web Title :   Maharashtra NCP Political Crisis | ajit pawar faction mlas meets sharad pawar at yb center prafull patel reaction

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Monsoon Session | ‘आधी होते खोके सरकार, आता आले बोके सरकार’, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची सरकार विरोधात घोषणाबाजी (व्हिडिओ)

Sanjay Dutt And Arshad Warsi | मुन्ना भाई व सर्किटची सुपरहिट जोडी पुन्हा झळकणार पडद्यावर? फोटोवरुन चर्चांना उधाण

Maharashtra Political Crisis | अजितदादा सर्व आमदारांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला, दादांनी आज पुन्हा थोरल्या पवारांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण

Maharashtra Monsoon Session | ठाकरे गटाचा नीलम गोऱ्हेंच्या पदावर आक्षेप, कायद्याचा उल्लेख करत अनिल परब म्हणाले… (व्हिडिओ)