Pune Crime News | येरवडा परिसरात दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार स्थानबद्ध ! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 32 वी MPDA ची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई (Pune Crime News) करण्यात आली आहे. आरोपीने येरवडा परिसरात दहशत माजवली होती. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत (MPDA Act) केलेली ही 32 वी कारवाई आहे.

विवेक उर्फ मिट्या प्रकाश गवळी Vivek alias Mitya Prakash Gawli (वय-20 रा. लक्ष्मीनगर पोलीस चौकीच्या मागे, लक्ष्मीनगर, येरवडा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला एक वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. (Pune Crime News)

विवेक उर्फ मिट्या गवळी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने व त्याच्या साथीदारांनी येरवडा, विश्रांतवाडी (Vishrantwadi Police Station), विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीत लोखंडी हत्यार, तलवार, लाकडी दांडक्याने खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत करणे, दंगा करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर आहेत. मागील 5 वर्षामध्ये त्याच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिक त्याच्याविरुद्ध उघड तक्रार करण्यास धजावत नव्हते.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम
(Senior PI Balkrishna Kadam) व पीसीबी गुन्हे शाखेचे
(Pune Police Crime Branch) वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे
(Senior PI Chandrakant Bedre) यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला.
त्याची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी त्याला मंजुरी दिली.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत 32 गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amitabh Bachchan | डिंपल कपाडियाच्या सततच्या फोनमुळे अमिताभ बच्चन
लागले रडायला

Ananya Pandey | अनन्याने शेअर केले व्हेकेशनमधील बिकनी फोटो;
चाहत्यांनी केली आदित्यची चौकशी