पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पोटजातीमधील मुलीसोबत लग्न केल्यामुळे श्रीगौड ब्राह्मण समाजाच्या (Shree Goud Brahman Samaj) जातपंचायतीने (Jat Panchayat) समाजातून बहिष्कृत केलेल्या एका व्यक्तीने पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) जात पंचायत सदस्यांविरुद्ध तक्रार (Complaint) दाखल केली आहे. जातपंचायतीच्या 23 वर्षाच्या मनमानी कारभाराला वैतागून या व्यक्तीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Andhashraddha Nirmoolan Samiti) मदतीने ही तक्रार दिली आहे. श्रीगौड ब्राह्मण समाजाच्या मुलीसोबत लग्न केले नाही म्हणून या व्यक्तीला 23 वर्षापूर्वी समाजामधून बहिष्कृत करत वाळीत टाकले होते. अनेकवेळा विनवण्या आणि लेखी पत्र देऊन देखील जात पंचायतीने त्यांची दखल (Pune Crime News) घेतली नाही.
याबाबत प्रकाश नेमचंद डांगे Prakash Nemchand Dange (वय-46 रा. हरपळे गल्ली, फुरसुंगी, पुणे) यांनी जात पंचायत सदस्य ताराचंद काळूराम ओजा, भरत नेमचंद मावणी, प्रकाश लालूचंद बोलद्रह उर्फ शर्मा, संतोष उणेसा, मोतीलाल भोराम शर्मा डांगी, बाळू शंकरलाल डांगी, प्रकाश असुलाल ओजा, भवरलाल डांगी, हेमराज ओजा यांच्या विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
श्रीगौड ब्राह्मण समाज हा मूळचा राजस्थान (Rajasthan) मधील किव्हाड पाली जिल्ह्यातील आहे.
गेल्या काही वर्षात या समाजातील मुलींची संख्या कमी झाली आहे.
लग्नासाठी मुली मिळत नसल्याने या समाजातील तरुणांनी पोटजातीत किंवा आंतरजातीय लग्न (Inter Caste Marriage) करुन आपला आयुष्याचा जोडीदार निवडला आहे. मात्र, ज्या मुलांनी पोटजातीत किंवा आंतरजातीय लग्न केले आहे, अशा मुलांना आणि त्यांच्या कुटुंबाला जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत करत वाळीत टाकले आहे.
समाजाने वाळीत टाकल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील इतर मुलांची लग्न होत नाहीत.
तसेच कोणत्याही नातेवाईकाच्या मंगलकार्यात, दु:खद परिस्थितीत त्यांना सहभागी होता येत नाही.
केवळ जात पंचायतीच्या मनमानी कारभारामुळे हा त्रास त्यांना सहन करावा लागतो.
यातून बाहेर पडता यावे यासाठी प्रकाश डांगे यांच्यासह जात पंचायतीच्या जाचाला कंटाळलेल्या इतर लोकांनी
पुणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मदत मागितली. या लोकांच्या वतीने समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
Web Title :- Pune Crime News | police file fri against shreegoud brahman samaj jat panchayat who ban man for inter caste marriage
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | प्रेमविवाहानंतरही संशय घेतल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
IND VS NZ | टीम इंडिया श्रीलंकेनंतर न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणार?