Pune Crime News | कोंढवा, लोणी काळभोर परिसरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 66 जणांवर कारवाई; 1 लाख 23 हजाराचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर आणि परिसरात अवैधरित्या सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर (Matka Gambling Den) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) कारवाईचा बडगा उगारला आहे. कोंढवा (Kondhwa Police Station) आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत सुरु असलेल्या मटका जुगार अड्यावर छापा टाकून पथकाने 66 जणांवर कारवाई करुन एक लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल (Pune Crime News) जप्त केला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी (दि.13) लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर गाव येथे मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पाळत ठेवून छापा टाकला. त्यावेळी पैशावर जुगार खेळणारे आणि खेळवणाऱ्या 23 जणांना ताब्यात घेऊन 68 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर 24 जणांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

सामाजिक सुरक्षा विभागाने दुसरी कारवाई शनिवारी (दि.11) कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली. कात्रज कोंढवा रोडवर मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये काही जण कल्याण मटका (Kalyan Matka) जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेऊन 54 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईसाठी कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, अजय राणे,
मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, इरफान पठाण, संदिप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Police raid gambling dens in Kondhwa, Loni Kalbhor area, action taken against 66 people; 1 lakh 23 thousand seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | सवंग प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ पातळी गाठली – राष्ट्रवादी

Karuna Munde | ‘रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा’ – करूणा मुंडे

Jalgaon Crime News | दुर्दैवी ! आत्तेभावाच्या लग्नाला जाताना 37 वर्षीय महिलेचा अपघात; जळगावमधील घटना