Pune Crime News | टपाल खात्यातील पोस्टमास्तरांनीच केली हेराफेरी; उपडाकघरात गुंतवणुक केल्याचे भासवून लाटले 23 लाखांचे कमिशन, 6 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | उप पोस्ट ऑफीसमध्ये (Post Office) आलेल्या गुंतवणुकदारांनी (Investor) केलेली गुंतवणुक (Investment) ही मुख्य डाकघरात केलेली आहे, असे दर्शवून त्यावर परस्पर कमिशन घेऊन तब्बल २३ लाख ७६ हजार २१५ रुपयांची पोस्ट खात्याची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी विश्रांतवाडी आणि विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) तीन गुन्हे दाखल आहेत. योगेश नानारसाहेब वीर Yogesh Nanarsaheb Veer (वय ४२, रा. खडकमाळ आळी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिघी उपडाकघरचे (Dighi Sub Post Office) पोस्ट मास्तर ज्योतीराम फुलचंद माळी Post Master Jyotiram Phulchand Mali (वय ४०, रा. येवलेवाडी), क्लार्क भगवान श्रीरंग नाईक Clerk Bhagwan Srirang Naik (वय ३६, रा. दिघी), धानोरी पोस्ट मास्तर गणेश तानाजी लांडे Dhanori Post Master Ganesh Tanaji Lande (वय ३७, रा. धानोरी), धानोरी पोस्ट मास्तर मधुकर गंगाधर सूर्यवंशी Dhanori Post Master Madhukar Gangadhar Suryavanshi (वय ४९,रा. भैरवनगर, धानोरी), रमेश गुलाब भोसले Ramesh Gulab Bhosale (रा. वानवडी), विलास एस देठे (वय ५९,रा. वानवडी) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट खात्याच्या नियमानुसार, उप डाकघरात गुंतवणूकदार आले व त्यांनी गुंतवणूक केली तर त्यावर पोस्ट मास्तर यांना कमिशन मिळत नाही. मात्र, डाकघरात गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली तर त्यामध्ये २ टक्के कमिशन पोस्ट मास्तरांना मिळते. हे नियमाचा गैरफायदा घेऊन दिघी पोस्ट कार्यालयात १६ जुलै २०१८ ते २१ ऑगस्ट २०२० दरम्यान दिघी उपडाकघरात २७४ गुंतवणुकदारांनी ९ कोटी ६२ लाख ९८ हजार रुपयांची गुंतवणूक पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये केली होती. त्यांना धानोरी शाखा डाकघर येथे खाते उघडण्यास लावल्याचे दाखविले. त्या रक्कमेपोटी १८ लाख ३५ हजार ११५ रुपये धानोरी डाकघरास दिले. ती रक्कम आपसात वाटून घेतली. पोस्ट खात्याची खातेदारांचा विश्वास संपादन करुन त्यांचे बनावट सह्या करुन पोस्टाची फसवणूक (Fraud Case) केली. (Pune Crime News)
त्याप्रमाणे डंकर्क लाईनमध्ये आलेल्या ५९ गुंतवणुकदारांची एकूण २ कोटी ४७ लाख ६० हजार रुपये रक्कम
स्वीकारुन त्यांचे बीआरडी डाकघरामध्ये टीडी खाते उघडण्यास लावून त्यांच्या कमिशनपोटी ४ लाख ९५ हजार २००
रुपये स्वीकारले. त्यातील ७५ टक्के रक्कम ज्योतीराम माळी याने घेऊन २५ टक्के रक्कम बीआरडी शाखा डाकपाल
रमेश भोसले यांना दिली.
विमाननगर येथील उपडाकघरात विलास देठे हा उपडाकपाल म्हणून कार्यरत असताना त्याने आवर्ती ठेवखाते
आणि सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खातेदारांनी त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आलेल्यांच्या
रक्कम स्वीकारुन त्यांच्या पासबुकवर नोंद करुन त्याची शासकीय फिनाकॅल प्रणाली मध्ये नोंद करायची
जबाबदार देठे यांच्यावर होती. त्याने १९ खातेदारांनी आवर्ती ठेव खाते व सुकन्या समृद्धी योजना या
योजनेअंतर्गत खात्यांमध्ये विविध तारखांना जमा केलेली ४५ हजार ९०० रुपयांची रक्कम सरकारी हिशोबामध्ये
जमा करता फसवणूक केली.
पोस्ट खात्याच्या अंतर्गत तपासणी आणि अचानक भेटी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे.
विश्रांतवाडी व विमानतळ पोलीस ठाण्यात हे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Web Title :-Pune Crime News | Postmasters in the Postal Department were the ones who manipulated; Commission of 23 lakhs was evaded by pretending to invest in upadak ghar, case registered against 6 persons
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update