Pune-Satara National Highway | पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घ्या, अन्यथा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune-Satara National Highway | पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 च्या हद्दीतील होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे 31 मार्च 2023 पर्यंत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे (National Highways Authority of India, Pune) यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील खेड शिवापूर टोल नाका (khed shivapur Toll Plaza) ते देहूरोड दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अनधिकृतपणे होर्डिंग्ज, केबल्स, दुकाने व इतर अतिक्रमणे (Encroachment) केले असल्याचे  निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणामुळे रा. म. क्र. ४८ च्या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. (Pune-Satara National Highway)

नागरिकांनी खेड शिवापूर टोल नाका ते देहूरोड दरम्यान  होर्डिंग्ज, केबल्स, दुकाने व इतर अतिक्रमणे असल्यास
31 मार्चपर्यंत स्वखचनि काढून घ्यावीत.अतिक्रमणे काढताना काही नुकसान किंवा असुविधा झाल्यास राजमार्ग
प्राधिकरण पुणे कार्यालय जबाबदार राहणार नाही. हे अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे
यांच्यावतीने दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अ‍ॅन्ड ट्राफिक-(Land and Traffic)  अ‍ॅक्ट
(The Control of National Highways Act) 2002 अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधीत धारकाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी कळविले आहे.

Web Title :-  Pune-Satara National Highway | Remove encroachments from Pune-Satara National Highway, otherwise…

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Chief Minister Eknath Shinde | प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांना कधी ‘फ्रेंच कट’ दाढीत पाहिलं का?, सुप्रिया सुळेंनी शेअर केला दुर्मिळ फोटो

Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | विकासाच्या ऐवजी राज्यातल्या गुन्ह्यांचा वेग डबल; सत्ता टिकविण्यासाठी डबल इंजिन सरकारची तडजोड सुरु – अजित पवार