Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar | कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली श्रीरामपूर व राहाता तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar) यांनी आज श्रीरामपूर (Shrirampur) व राहाता (Rahata) तालुक्यात बेमोसमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेती बांधावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. (Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar)

झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही मंत्री अब्दुल सत्तार (Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner Sunil Chavan), पुणे येथील विभागीय कृषी सह संचालक रफिक नाईकवडी (Divisional Agriculture Joint Director Rafiq Naikwadi), जिल्हा अधीक्षक शिवाजी जगताप (District Superintendent Shivaji Jagtap) , उप विभागीय कृषी अधिकारी नलगे, आत्माचे उपसंचालक गायकवाड, राहात्याचे तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे (Agriculture Officer Bapusaheb Shinde), श्रीरामपूरचे अशोक साळी (Shrirampur Ashok Sali) आदी उपस्थित होते.

राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis) लवकरच निर्णय घेतील, असेही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राहता तालुक्यातील नांदूर येथे सुखदेव म्हस्के यांच्या द्राक्ष शेतीची तर श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे बाळासाहेब ढोकसवळे यांच्या शेतीमधील मका व कांदा पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी महसूल, ग्रामविकास, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title :- Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar | Maharashtra
Agriculture Minister Abdul Sattar inspected the crops in the damaged
areas of Srirampur and Rahata talukas

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

NHAI Appeal To Remove Encroachments On Pune-Satara National Highway |
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन

Maharashtra Minister Atul Save | वसतिगृह अधीक्षकांना नियमानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी
लागू करणार – मंत्री अतुल सावे

Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis | औष्णिक विद्युत प्रकल्पातील
राखेच्या संदर्भात लवकरच धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mumbai Crime News | मुंबईत थरार! कौटुंबिक वादातून शेजारी राहणाऱ्या 5 जणांवर चाकूने
सपासप वार, 2 जणांचा जागीच मृत्यू