Pune Crime News | खाणीत पडून 21 वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कचरा टाकण्यासाठी खाणी (Mine) जवळ गेलेल्या तरुणीचा तोल गेल्याने खाणीत पडून गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता. याप्रकरणी (Pune Crime News) सुनील तुळशीराम महाजन व तुळशीराम सीताराम महाजन यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) आयपीसी 304, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावले (Additional Sessions Judge V.A. Patravale) यांनी अटकपूर्व जामीन मंजूर (Granted Anticipatory Bail) केला आहे, अशी माहिती आरोपींचे वकील अॅड. तन्मय देव (Adv.Tanmay S Deo) यांनी दिली.

ऋतिका जयवंत काळे Ritika Jayavant Kale (वय-21) या तरुणीचा 11 नोव्हेंबर 2022 रोजी कचरा टाकण्यासाठी गेली असता खाणीत तोल जाऊन पडली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिची आई कल्याणी जयवंत काळे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सुनील तुळशीराम महाजन (Sunil Tulshiram Mahajan) व तुळशीराम सीताराम महाजन (Tulshiram Sitaram Mahajan) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आरोपींनी अ‍ॅड. तन्मय देव यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. (Pune Crime News)

आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. तन्मय देव यांनी सांगितले की, खाणीचे मालक सुनील महाजन
आणि तुळशीराम महाजन यांनी खाणीला चारी बाजूने तारेचे कंपाऊंड केले आहे.
हे लोक त्यांच्या जागेत कचरा टाकत होते. त्यांना या जागेत कचरा टाकण्याचा कोणताही अधिकार नसताना ते
महाजन यांच्या जागेत कचरा टाकत होते. खाणीला कंपाऊंड असताना मयत तरुणी ऋतिका काळे ही त्या
ठिकाणी कचरा टाकण्यासाठी गेली होती, असा युक्तिवाद अ‍ॅड. देव यांनी न्यायालयात केला.

न्यायालयाने अ‍ॅड. देव यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणात अ‍ॅड. तन्मय देव, यांना अ‍ॅड. प्रसाद निकम (Adv. Prasad Nikam) अ‍ॅड. मन्सूर तांबोळी
(Adv.Mansoor Tamboli) आणि अ‍ॅड. शुभम बोबडे (Adv.Shubham Bobade) यांनी सहकार्य केले.

Web Title :- Pune Crime News | Pre-arrest bail granted to the accused in the death case of 21-year-old girl who fell in the mine

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | राज्यातील पाचही विधानपरिषदेच्या मतदारसंघाच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट, नाशिकमध्ये तिरंगी लढत; जाणून घ्या पाच ठिकाणी कशी होणार लढत?

Nashik Graduate Constituency Election | नॉट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील माध्यमांसमोर येताच म्हणाल्या…

Kirit Somaiya | हसन मुश्रीफ यांच्याबाबतची ‘ती’ भूमिका चंद्रकांतदादा पाटील यांनीच स्पष्ट करावी – किरीट सोमय्या